ETV Bharat / city

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांचा 'या' प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले... - प्रवीण दरेकर मराठी बातमी

राणा दाम्पत्यावर लावलेला राजद्रोहाचा गुन्हा हा चुकीचा ( Sedition Charge Against Rana Couple ) होता, असे मत सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. यावर आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली ( Pravin Darekar Criticized Thackeray Government ) आहे.

Pravin Darekar
Pravin Darekar
author img

By

Published : May 6, 2022, 7:13 PM IST

मुंबई - हनुमान चालीसा पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर लावलेला राजद्रोहाचा गुन्हा हा चुकीचा होता, असे मत सत्र न्यायालयाने नोंदवले ( Sedition Charge Against Rana Couple ) आहे. यावर बोलताना भाजप नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत ( Pravin Darekar Criticized Thackeray Government ) होते.

"राजद्रोहाचा गुन्हा होत नाही" - प्रवीण दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारला पुन्हा एकदा न्यायालयाने त्यांच्या मनमानी कारभारासंदर्भामध्ये चपराक दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, राणा दाम्पत्याला पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ते घराबाहेर पडले नाहीत. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जे काय ते आंदोलन करणार होते ते त्यांनी मागे घेतले. अशा परिस्थितीमध्ये 124 ए अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे, अत्यंत चुकीचे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवलं आहे. या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारची मनमानी पुन्हा एकदा न्यायालयाने जनतेसमोर आणली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

"बेधुंदशाही सुरू आहे" - महाविकास आघाडी सरकार भाजपच्या प्रत्येक आमदार, नेत्यांवर गुन्हे दाखल करते व त्या सर्वांना न्यायालय दिलासा देतो. मग त्या ठिकाणी नारायण राणे, गणेश नाईक, मोहित कंबोज, अनिल बोंडे, बबनराव लोणीकर असतील किंवा मी स्वतः असेन. अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून बेधुंदशाही सुरू आहे, असा आरोप दरेकरांनी केला आहे.

प्रवीण दरेकर आणि राम कदमांची प्रतिक्रिया

"सरकारची प्रतिमा मलिन होत आहे" - महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयाने दहा-बारा दिवस नाहक राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होत. हे चुकीचे होत असे न्यायालयाने सांगितलेलं आहे. आज त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तमात उत्तम काम करत आहेत. परंतु, राज्यामध्ये ब्रिटिशाप्रमाणे दडपशाही सुरू आहे. तुमचीच लोक बलात्कार, विनयभंग करत आहेत. हा सर्व मनमानी कारभार सुरू आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.

"ठाकरे सरकारने राणा परिवाराची माफी मागावी" - मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्यावर 124 ए अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १२ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. या प्रकरणी आता न्यायालयाने हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी ठाकरे सरकारने राणा परिवाराची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते, आमदार राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Dilip Walse Patil : राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून न्यायालयाचे ताशेरे; गृहमंत्री म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.