मुंबई - मुंबई बँक फसवणूक प्रकरणात ( Mumbai Bank Fraud Case ) विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना रमाबाई आंबेडकर पोलिसांकडून अटक करण्यात आले ( Pravin Darekar Arrested ) होती. त्यानंतर त्यांना 35 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीनावर सोडण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दरेकरांना दिलासा देत या गुन्ह्यात अटक झाल्यास तात्काळ सुटका करण्याचे आदेश देत नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दरेकर यांना अपात्र ठरवत मजूर म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 35 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांची हमी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ( 13 मे ) माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकरांना बोलावण्यात आले होते. त्यानुसार दरेकर यांना पोलीस अटक दाखवून जामीन देण्यात आला.
काय आहे प्रकरण? - प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मजूर असल्याचं दाखवून आणि 1997 पासून 2021 पर्यंत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येत आहेत. मजूर असल्याचे भासवून नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक केली, या आरोपाखाली प्रवीण दरेकर यांच्याविरोधात आम आदमी पक्षाच्यावतीने धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात अटक झाल्यास दरेकर यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, असा निर्णय कोर्टाने दिल्याने दरेकर यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Warehouse Fire Delhi : दिल्लीतील तीन मजली इमारतीला आगीत मृतांचा आकडा २७ वर, १२ जण जखमी