ETV Bharat / city

चित्रा वाघ यांच्याशी सरकार सूडबुद्धीने वागत आहे- प्रवीण दरेकर - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेत सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Feb 27, 2021, 4:02 PM IST

Updated : Feb 27, 2021, 9:04 PM IST

मुंबई - भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेत सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर चांगलेच संतापले आहेत आणि त्यांनी सरकारला प्रश्न केला आहे की, जर सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात बोललं तर यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर, हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.

प्रवीण दरेकर

न्यायासाठी भाजपा लढत राहील-

प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर केलेला गुन्हा दाखल हा राजकीय सूडभावनेतून केला असल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आताचं माध्यमांच्या मार्फत ही गोष्ट पुढे आणणं म्हणजे या ही सूडभावनेतून केलेली कारवाई आहे.

चित्रा वाघ लढवय्या नेत्या आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्या एकट्या नाहीत. दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही जे चुकीचं आहे त्याच्या न्यायासाठी भाजपा लढत राहील.

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत सुडाचं राजकारण-

चित्रा वाघ लढत राहतील आणि त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशा प्रकारचं सूडभावनेन राजकारण सरकार करत आहे. अशा अनेक प्रकरणावरून सरकारच्या विरोधात बोललं, सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, न्याय मागितला तर गळचेपी करायची, अशा प्रकारचं सुडाचं राजकारण महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत दिसून येत असल्याचे दरेकर म्हणाले.

हेही वाचा- मंत्री संजय राठोडांविरोधात भाजप महिला मोर्चाचे पालघरमध्ये आंदोलन

Last Updated : Feb 27, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.