मुंबई - दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या आहेत. या विजयाने शिवेसेनेचा राज्याबाहेर पहिला खासदार जिंकून आला आहे. शिवसेनेसाठी ही अटीतटीची लढाई असलीतरी भावनिक मुद्द्यावर डेलकरांचा विजय झाला आहे, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दादरा नगर हवेली येथे शिवसेनेच्या डेलकर विजयी झाल्या आहेत तर देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेस चे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. हे दोन्ही विजय राज्यातील महाविकास आघाडी साठी फार महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पराभवाने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की कामासाठी त्यांना (शिवसेनेला) शुभेच्छा. महाविकास आघाडी हे अनैसर्गिकरित्या स्थापन झाले आहे. शिवसेनेने मराठी अस्मिता व हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. ते राष्ट्रीय राजकारणात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा. आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही.
राष्ट्रीयस्तरावर शिवसेनेचे छाप
दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या विजयी झाल्या आहेत. कलाबेन डेलकर यांच्या रूपाने शिवसेनेला राज्याबाहेर पहिला खासदार मिळाला आहे. शिवसेना व ठाकरे कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीयस्तरावर आपली छाप पाडू इच्छिणाऱ्या शिवसेनेची दिवाळी या विजयने उत्साहात आहे. तसेच डेलकरांच्या विजयाने महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असणारी असणाऱ्या शिवसेना आता एक पाऊल पुढे गेली आहे.
हेही वाचा-दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी
शिवसेनेकडून पूर्ण तयारी-
राज्याबाहेर पहिला खासदार करण्याच्या निर्धाराने शिवसेनेनेदेखील ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून अनेक खासदारांवर तेथील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली होती. दादरा-नगर हवेलीचे ७ वेळचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घोषित झाल्यापासून शिवसेनेने जागा जिंकण्यासाठी पूर्ण तयारी केली होती.
हेही वाचा-देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव -
कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश धोडी यांचा पराभव केला. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा शहरातील कराड भागात सकाळी 8.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अनुसूचित जमाती (एसटी) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या या लोकसभा जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक झाली.
भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. गुजरातमधील दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. येथील खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. येथून शिवसेनेने दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.