ETV Bharat / city

Praveen Darekar Criticism on Government : न्यायदेवता निश्चितपणे न्याय देईल यावर पूर्ण विश्वास – प्रवीण दरेकर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मजूर प्रकरणी ( Mumbai Bank ) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) 15 दिवसांचा दिलासा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Praveen Darekar ) यांना दिला आहे. त्यावर दरेकर म्हणाले, माझा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण ही केस राज्य सरकारने जबरदस्तीने पोलिसांवर दबाव आणून बनवली आहे. त्यामुळे न्यायालयात सुनावणी होईल, त्यावेळी न्यायदेवता निश्चितपणे मला न्याय देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मुंबई भाजप कार्यालयात ते बोलत होते.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Mar 29, 2022, 10:35 PM IST

मुंबई - मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मजूर प्रकरणी ( Mumbai Bank ) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) 15 दिवसांचा दिलासा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Praveen Darekar ) यांना दिला आहे. त्यावर दरेकर म्हणाले, माझा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण ही केस राज्य सरकारने जबरदस्तीने पोलिसांवर दबाव आणून बनवली आहे. त्यामुळे न्यायालयात सुनावणी होईल, त्यावेळी न्यायदेवता निश्चितपणे मला न्याय देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मुंबई भाजप कार्यालयात ते बोलत होते.

आम्ही सरकारच्या कुठल्याही दबावाला, दंडेलशाहिला दबणार नाही - महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी हा जो संकल्प मांडला आहे त्याचे कारण त्यांचे काही नेते तुरुंगात आहेत, काही जाण्याच्या मार्गावर आहेत, असे असताना आपणही क्रियेला प्रतिक्रिया दिली पाहिजे. मग भाजपचा कुठला नेता आपल्याला अडकवता येतोय का? गिरीश महाजन यांच्या बाबतीत षड्यंत्र केले. मोहित कंबोज, प्रसाद लाड यांच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. पण, आम्ही चिंता करत नाही. जर चुकीचे सांगितले असेल, तर तपास यंत्रणा तपास करुन कारवाई करेल आणि न्यायालय उचित असा न्याय देत असते. त्यामुळे आम्ही सरकारच्या कुठल्याही दबावाला, दंडेलशाहिला दबणार नाही. जी प्रक्रिया असेल, त्या प्रक्रियेला सामोरे जाऊ आणि या सरकरविरोधात असलेला आवाज दाखवून देऊ, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

धनंजय शिंदे, नाना पटोले, भाई जगताप, यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार - ज्या बँकेचा नफाच 15-16 कोटी आहे, तिचा घोटाळा दोन हजार कोटींचा कसा होणार, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केले. ज्यांनी अशा प्रकारचे बेताल आरोप केले, ते धनंजय शिंदे, नाना पटोले किंवा भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा यथावकाश करणार आहे, असेही दरेकर म्हणाले. नाना पाटोलेही बोलतात दोन हजार कोटींचा घोटाळा झाला, मला यावर हसायला येते. धनंजय शिंदे त्यांनी आम आदमी पक्षाची प्रतिमा बेजबाबदार बनवली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - AAP on Pravin Darekar : दरोडेखोर प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवा, आपची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.