ETV Bharat / city

Har Ghar Tiranga भायखळ्यात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत अभिनेत्री डायना पेंटीच्या उपस्थितीत प्रभातफेरी - ई विभाग कार्यालय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाविषयी ठीकठाकाणी जनजागृती केली जात आहे मुंबई येथील महानगरपालिकेच्या भायखळा ई विभाग कार्यालयाच्यावतीने आज एकाचवेळी सात ठिकाणाहून प्रभातफेरी काढण्यात आली सिनेअभिनेत्री डायना पेंटी यांच्या उपस्थितीत ही प्रभातफेरी काढण्यात आली

Har Ghar Tiranga
अभिनेत्री डायना पेंटीच्या उपस्थितीत प्रभातफेरी
author img

By

Published : Aug 12, 2022, 7:36 PM IST

मुंबई स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या "हर घर तिरंगा" (Har Ghar Tiranga) अभियानाविषयी ठीकठाकाणी जनजागृती केली जात आहे. मुंबई येथील महानगरपालिकेच्या (Har Ghar Tiranga Abhiyan in Byculla) भायखळा ई विभाग कार्यालयाच्यावतीने आज एकाचवेळी सात ठिकाणाहून प्रभातफेरी (Prabhat Pheri) काढण्यात आली. सिनेअभिनेत्री डायना पेंटी (Diana Penty) यांच्या उपस्थितीत ही प्रभातफेरी काढण्यात आली.

प्रभातफेरीचे आयोजन बृहन्मुंबई महानरपालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालय येथून प्रभातफेरीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक पोलिस प्रशासन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या शाळांचे विद्यार्थी आणि महानगरपालिका कर्मचारी इत्यादी सहभागी झाले. या प्रभातफेरीसाठी बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‘ई’ विभाग परिसरात एकाचवेळी सात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रभातफेरी निघाली. यानंतर, ‘स्वातंत्र्य लढ्यातील भायखळ्याचे योगदान’ या संकल्पनेवर ई विभाग कार्यालयामार्फत तयार केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील डायना पेंटी यांच्या हस्ते करण्यात आले.

अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रभातफेरीच्या माध्यमातून उपआयुक्त (परिमंडळ - १) चंदा जाधव यांनी सर्व स्थानिक रहिवाश्यांना १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी आवाहन केले. तसेच ई विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सावित्रीबाई फुले शाळा, पूर्व भायखळा मराठी शाळा, वाडीबंदर शाळा, शेठ मोतिशा शाळा, आग्रीपाडा शाळा येथून उपस्थित सुमारे ५०० विद्यार्थ्यांना संबोधित करुन त्यांना अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

विविध कार्यक्रमाचे आयोजन ई विभागामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारती, महापौर निवास, महाराणा प्रताप चौक, खडा पारसी पुतळा, नागपाडा चौक इत्यादी ठिकाणी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. तसेच विभागातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देखील सजावट करण्यात येत आहे. तसेच कामाठीपुरा परिसरात नाईलाजाने देहविक्रय करुन उपजीविका भागविणाऱ्या महिलांसाठी ‘मेरा घर - स्वच्छ सुंदर घर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : INTERNATIONAL YOUTH DAY : उर्जेचा अखंड प्रवाह युवकांच्या हातात जगाचं भविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.