मुंबई- आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील ( Aryan Khan Cruise Drugs Case ) महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रभाकर साईल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Prabhakar Sail Death ) झाले. मात्र, या प्रकरणाला आता वेगळं वळण आलं असून प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश तपासे यांनी चौकशीची मागणी केली ( NCP Demands Investigation ) आहे. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) यांनी तात्काळ पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले ( DGP Investigate Prabhakar Sail Death Case ) आहेत. प्रभाकर साईल यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सुरुवातीला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर या प्रकरणात प्राथमिक चौकशीत समोर काय समोर येते त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप पाटील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास : मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रभाकर हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशासमोर आणला होता. एनसीबीचा तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे कशा फर्जी कारवाई करतो हे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत सिद्ध केले होते. त्यामुळे केंद्रीय एजन्सी असलेल्या एनसीबीची देशभर नाचक्की झाली होती असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे महेश तपासे म्हणाले.
क्रुझ कारवाईच्या दिवशी काय झालं : प्रभाकर साईल यांनी जबाबात सांगितलं होते की, क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते आणि ते फोटो असलेले लोक आले की, त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की, मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं असं साईल यांनी सांगितलं.
प्रभाकर साईल आरोप काय? : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील दुसरं चर्चेतील पात्र म्हणजे प्रभाकर साईल. गोसावीप्रमाणेच साईलही क्रूज ड्रग्जपार्टी प्रकरणात NCB चा स्वतंत्र साक्षीदार आहे. प्रभाकर साईल किरण गोसावीचा बॉडीगार्ड. पण, त्याने आर्यन खान प्रकरणी शाहरूखकडून खंडणी वसूलण्याचा प्लान होता असा आरोप करत खळबळ उडवून दिली. ड्रग्ज प्रकरणानंतर अचानक प्रभाकर साईल मीडियासमोर आला. किरण गोसावी शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीला भेटला. फोनवर किरणने सॅम डिसूजाला 25 कोटींची खंडणी मागण्यासाठी सांगितलं. 8 कोटी रूपये समीर वानखेडेंना द्यायचे आहेत असंही फोनवरचं बोलणं ऐकल्याचा दावा त्यांनी केला. NCB ने साईलचे आरोप फेटाळून लावले आहेत.