ETV Bharat / city

Mumbai Drug Case : मुंबई पोलिसांनी पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलनं रात्री मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांचे झोन वनच्या डिसीपींच्या ऑफिसमध्ये प्रभाकर साईल मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 8 तासांपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल हा पंच असून किरण गोसावीचा अंगरक्षक आहे.

Prabhakar sail recorded his statement by Mumbai Police
प्रभाकर साईल
author img

By

Published : Oct 27, 2021, 10:23 AM IST

मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण मिटवण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांच्या झोन एकचे डीसीपी कार्यालयात जबाब नोंदविण्यात आला आहे. तब्बल 8 तास जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल हा पंच असून किरण गोसावीचा अंगरक्षक आहे.

ड्रग्ज प्रकरणी खटला निकाली काढण्यासाठी 25 कोटींचा सौदा झाल्याची चर्चा ऐकल्याचा दावा प्रभाकरने केला आहे. त्यापैकी 18 कोटींचा करार होणार होता. तर 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. किरण गोसावी हा व्यवसायाने गुप्तहेर असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा साक्षीदारही आहे. सध्या किरण गोसावी हा फरार आहे. प्रभाकरने सांगितले की, तो किरण गोसावीचा वैयक्तिक अंगरक्षक म्हणून काम करतो. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी ते गोसावी यांच्यासोबत होते. या घटनेनंतर किरण गोसावी गूढपणे गायब झाल्यापासून त्याच्या जीवाला धोका असल्याचे प्रभाकर सांगतात.

प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, त्याने एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसोझा यांची भेट घेतली. त्यावेळी ते के.पी.गोसावी यांना भेटण्यासाठी आले होते. लोअर परळजवळील बिग बझारजवळील एनसीबी कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांवरून फोनवर बोलत असल्याचा दावा या शपथपत्रात करण्यात आला आहे. समीर वानखेडेला 8 कोटी रुपये देण्याचेही त्यांनी बोलले आहे.

समीर वानखेडे क्रूझकडून ड्रग्ज जप्त करण्याच्या तपासाचे नेतृत्व करत आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या बनावट जन्म प्रमाणपत्राचाही आरोप आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा - समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.