मुंबई - पुढील 3 ते 4 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, दापोली, रत्नागिरी, पुणे, नाशिक या परिसरात ढग जमा झाले आहेत.
मुंबई आणि उपनगरामध्ये अंधार झाला आहे. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतल्यामुळे अनेकांनी आज छत्री आणि रेनकोट आणले टाळले. यामुळे अनेकांची आडोशाला जाण्यासाठी तारांबळ उडाली.
पुढील हवामानाचा अंदाज:
१२-१३-सप्टेंबर: कोकण-गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१४-१५ सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
इशारा:
११ सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१२ सप्टेंबर: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
१३ सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
१४-१५ सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.