मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहू शकतात. येत्या दोन ते तीन दिवसांत द. कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीच्या भागात सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुढील हवामानाचा अंदाज:
१९ सप्टेंबर : कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
२० - २२ सप्टेंबर : कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी तर, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
२२ सप्टेंबर : गोव्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या भागात सावधानतेचा इशारा.
इशारा:
१९ सप्टेंबर:
- कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
- किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
२० सप्टेंबर: - दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
- महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता..
२१ सप्टेंबरः - दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
- महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
२२ सप्टेंबर: - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.