मुंबई 2 वर्षानंतर कोरोनाचे सावट कमी झाल्याने निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा केला जातोय. या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात राजकीय बॅनरबाजी देखील पाहायला मिळते. Maharashtra Politics प्रत्येक पक्षाने आपल्या सोयीप्रमाणे गणेशोत्सवात बॅनरबाजी करत राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय. Mumbai Banner from bjp मात्र या बॅनर बाजीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे.
मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू झाला आहे. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सणांवर बंधन होते. ते बंधन यावर्षी दूर झाले आहेत. त्यामुळे निर्बंध मुक्त असे सण साजरे केले जातायात. आधी दहीहंडी आणि त्यानंतर लगोलग आलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असला तरी, Political banner in front of Ganesh Mandal साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळतेय. दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातोय. यानिमित्ताने प्रत्येक पक्ष राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे नेत्यांची बॅनरबाजी पाहायला मिळते. ज्यामधून राजकीय टोमणे आणि वर्चस्वाची लढाई होताना दिसतेय. या बॅनरबाजी साठी सर्वच पक्षाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे.
भाजपाचा महाविकास आघाडीला टोला गणेश उत्सव थाटामाटात आणि निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला. त्यामुळे आपलं सरकार आल्याने हिंदू सणान वरील निबंध काढून टाकण्यात आले असा प्रचार राज्य सरकारकडून सुरू झाला आहे. यापुढे जात भारतीय जनता पक्षाने मुंबईभर याबाबतचे बॅनर झळकावले आहेत. Political banner in front of Ganesh Mandal मुंबईत अनेक ठिकाणी बेस्ट बस स्टॉप वर किंवा बेस्ट बस वर भारतीय जनता पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रमुख सरकार आल्यामुळेच हिंदू सणान वरील निबंध मुक्त झाली असल्याचे बॅनर मधून सांगण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे बॅनर शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने आपले लक्ष केंद्रित केला आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात होणाऱ्या दहीहंडीचे चे आयोजन या वेळी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले तर तेथेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता नाही हा राजकीय वाद पाहायला मिळतोय. वरळी मध्ये असलेल्या मार्केटचा राजा म्हणून ओळखला जाणारा विघ्नहर्ता सार्वजन गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांचे बॅनर झळकले आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे सणाच्या माध्यमातून बॅनरबाजी करत आदित्य ठाकरे यांच्याच मतदार संघात विरोधकांची राजकीय बॅनरबाजी पाहायला मिळते.
बॅनरबाजीत भाजप आघाडीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील तीन महिन्या नंतर कधीही होऊ शकतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत असलेल्या गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाकडून बॅनरबाजी पाहायला मिळते. जवळपास सर्वच पक्षांत कडून ही बॅनरबाजी मुंबई भर सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट अशा सर्वांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरामध्ये राजकीय बॅनरबाजी केलेली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या बॅनरबाजी मध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळते. खास करून मुंबई महानगरपालिकेतील बस स्टॉप आणि बेस्ट बसेस वर भारतीय जनता पक्षाकडून केलेली बॅनरबाजी सर्वत्र आढळत आहे. आपलं सरकार आल्यामुळे हिंदू सणान वरील निर्बंध हटले असल्याचे बॅनर बाजारातून सांगण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही बॅनर बाजी अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
राष्ट्रवादीकडून भाजपच्या बॅनरबाजीवर टीका राज्यामध्ये तात्कालीन महा विकास आघाडी सरकार असताना कधी हिंदु सण किंवा इतर कोणत्याही धर्मांच्या सणांवर बंदी आणली नव्हती. मात्र राज्यात गेली दोन वर्ष कोरोनाच सावट होतं. सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका होता. म्हणूनच सर्व सणांवर काही बंधन राज्य सरकारने आणली होती. आणि त्यामुळेच आज नवीन सरकार निर्बंध मुक्त सण साजरे करण्याचा निर्णय घेऊ शकले. मात्र आज सत्तेत आल्यानंतर एखादा पक्ष आपण सत्तेत आल्यामुळे हिंदू धर्मातील सणांवर तील निर्बंध मिटले असल्याचं म्हणत असेल तर त्याला काय म्हणावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला नाव न घेता लगावला.
भाजपची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा भारतीय जनता पक्षाने बेस्ट बसवर केलेली जाहिरात म्हणजे चिल्लर पण आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच सावट रोखण्यासाठी बंधने घालण्यात आली होती. मात्र त्यावेळी ही मंदिरे उघडा सतरा भरवा अशा अनेक मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष हट्ट करत होता. यासाठी राज्यभर भारतीय जनता पक्षाने काढलेल्या यात्रा मुळेच राज्यात कोरोना वाढला. मात्र आता सत्तेत आल्यानंतर आमच्यामुळेच कोरोना गेला असा अविर्भाव भारतीय जनता पक्ष अनंत आहे. हा भारतीय जनता पक्षाचा थिल्लरपणा असल्याचा टोला शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी भाजपला लगावला आहे.