मुंबई- राज्यसभेची निवडणूक 10 जूनला ( Rajya Sabha elections in Maharashtra ) होणार आहे. यासाठीची सर्व तयारी महाविकास आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाकडून जोरदार सुरू आहे. मात्र, 10 जूनला राज्यसभा निवडणूक संपताच 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ( Maharashtra Legislative Council elections ) ही निवडणूक होणार आहे.
राजकीय पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच ( preparations for the Assembly elections ) सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी 9 जून ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ( Candidature application for MLA election ) आहे. आजपासून या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवारांनी यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर तिथेच महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवारदेखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या या आमदारांचा कार्यकाळ पूर्ण - शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड, भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, सुजित सिंह ठाकुर, विनायक मेटे, रामनिवास सिंह (त्यांचे निधन झाले आहे) या जागा रिक्त झाल्या आहेत. या दहा जागांवर 20 जूनला विधान परिषदेवर नवीन उमेदवार धाडले जाणार आहेत.
राजकीय पक्षांकडून या उमेदवारांची मोर्चेबांधणी - भारतीय जनता पक्षाच्या सहा आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मात्र, या वेळी भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ पाहता केवळ चार आमदार सुरक्षितपणे विधान परिषदेत पोहोचतील. मात्र पाचव्या उमेदवारासाठी भारतीय जनता पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसणार आहेत. आज 8 जून रोजी भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे अशा 5 उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले आहेत. तर तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुन्हा एकदा राम राजे निंबाळकर यांना संधी दिली जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर तिथेच शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी दिली गेली आहे. सोबतच काँग्रेसकडून सचिन सावंत, मोहन जोशी आणि नसीम खान यांची नावे चर्चेत आहेत.
असे असणार जिंकून येण्याचे गणित - विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 आमदारांच्या मतांची गरज लागणार आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी आमदारसहीत त्यांचा आकडा 113 एवढा आहे. या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाच्या चार जागा विधान परिषदेवर सहज निवडून जाऊ शकतात. मात्र, भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केल्यामुळे पाचवा जागेसाठी त्यांना आपली सर्व ताकद पणाला लावून पुन्हा एकदा इतर लहान गट किंवा अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावावे लागणार आहे.
तर तिथेच शिवसेनेचे 56 राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार विधान परिषदेत धाडले जातील. तर काँग्रेसकडून एक उमेदवार निश्चित विधान परिषदेत जाईल. मात्र सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला देखील रस्सीखेच करावी लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम ( MH Legislative Council elections program )
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जून
- अर्जाची छाननी 10 जून
- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 13 जून
- मतदान 20 जून, वेळ सकाळी 9 ते सायंकाळी चारपर्यंत
- मतमोजणी 20 जून सायंकाळी पाच वाजता
हेही वाचा-Pankaja Munde : फडणवीसांशी 'पंगा' पंकजा मुंडेंना नडला..? राज्यसभेनंतर विधानपरिषदेचीही उमेदवारी नाहीच
हेही वाचा-Rajya Sabha Election : धनंजय महाडिकांची राज्यसभेसाठी उमेदवारी अन् बंटी पाटलांचा अॅक्टिव्ह मोड; कोल्हापुरातील राजकाण तापले