ETV Bharat / city

नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, जाणून घ्या राजकीय कारकीर्द

आज (१२ फेब्रुवारी) नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळणार असून पक्षसंघटना मजबूत होईल, असा विश्वास अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

political career of nana patole
नाना पटोले यांनी स्विकारला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार, जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द
author img

By

Published : Feb 12, 2021, 5:38 PM IST

Updated : Feb 13, 2021, 6:59 AM IST

मुंबई - नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळणार असून पक्षसंघटना मजबूत होईल, असा विश्वास अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

कोण आहे नाना पटोले?

नाना पटोले हे विदर्भातील बहुजन समाजातून पुढे आलेले आक्रमक नेतृत्व आहे. 1999 पासून साकोली मतदारसंघाचे ते सातत्याने प्रतिनिधित्त्व करत आहेत. 2008 साली शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवत ते आमदार झाले. काँग्रेसचा एक बहुजन चेहरा भाजपमध्ये दाखल झाल्याने विदर्भातून याचा अधिक फायदा घेण्याच्या उद्देशाने भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. यावेळी जनतेने पटोलेंना साथ देत लोकसभेत खासदार म्हणून निवडून पाठवले. मात्र, जनतेतून पुढे आलेले हे नेतृत्व भाजप आणि मोदींच्या जनविरोधी धोरणाने अस्वस्त होणार नाही, असे होणे शक्य नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन पटोलेंनी एक प्रकारे भाजपमध्ये बंडाचा झेंडा उभारला. पंतप्रधान मोदींची धोरणे ही शेतकरी विरोधी आहेत आणि पंतप्रधान पक्षातील खासदारांचेही ऐकून घेत नाहीत, असे म्हणत नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. एक प्रकारे नाना पटोले हे मोदींशी दोन हात करत भाजपमधील एकाधिकारशाहीला नाकारणारे पहिले नेते ठरले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ काँग्रेसने घातली.

आक्रमक भूमिकेने नवी छाप पाडण्याचा प्रयत्न

एक वर्षाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष असताना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या आक्रमक भूमिकेने मंत्र्यांवर एक नवी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच, या पदावर असताना पक्षसंघटनेत अधिक काम करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम असून ती संधी मिळत नसल्याने त्यांनी बऱ्याचदा उघड नाराजी जाहीर केली होती.

का दिला विधानसभाध्यक्ष पदाचा राजीनामा?

काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावरून एकनाथ गायकवाड यांना दूर करून आमदार भाई जगताप यांच्याकडे ही धुरा सोपवली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाचे वारे काँग्रेसमध्ये जोरात वाहू लागले. प्रदेशाध्यक्षपदी थोरातच कायम राहतील, कशी काँग्रेसमध्ये चर्चा होती. मात्र, एक व्यक्ती-एक पद या तत्त्वामुळे काँग्रेसने थोरात यांचा राजीनामा घ्यायचे निश्चित केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होणार होते. तसेच, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे प्रदर्शन बघता काँग्रेसला राज्यात एका सक्षम नेतृत्त्वाची गरज होती. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देखमुख, पृथ्वीराज चौहान यांच्यासह पटोले यांचेही नाव होते. अखरे नाना पटोलेंच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

नाना पटोलेंच्या नियुक्तीने काँग्रेसला होणार फायदा?

महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती बघता काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. नाना पटोले हे विदर्भातील एक महत्त्वाचे नेते असून काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा आहे.

  • जातीय समिकरणे

महाराष्ट्रात भाजप हा पक्ष ओबीसींच्या मतांवर मोठा झाला आहे. तसेच, भाजप मराठा आरक्षणावरून आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणीसुद्धा अनेकदा पुढे आली आहे. परंतु, याला ओबीसी समाजाचा आक्षेप आहे. त्यामुळे, भाजप मराठा आरक्षणावर जितका आक्रमक होईल, तेवढा ओबीसी समाज भाजपपासून दुरावत जाण्याची शक्यता आहे. अशावेळी ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो. त्यामुळे, राज्यातील जातीय समिकरणे लक्षात घेता. नाना पटोलेंची नियुक्ती महत्त्वाची ठरते.

  • शेतकरी प्रश्नांची जाण असलेला नेता -

नाना पटोले यांच्या जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे, त्यांना शेतीच्या प्रश्नांची जाण आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता, अशी नाना पटोलेंची ओळख आहे. तसेच, ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्षदेखील राहिले आहे. त्यांचे देशातील विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहे. या सगळ्यांचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

  • विदर्भातील महत्त्वाचे नेते -

एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जायचा. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसला विदर्भात पराभव स्विकारावा लागला. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला थोडेफार यश मिळाले होते. या निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे विदर्भातील आपले वर्चस्व परत मिळवण्यासाठी नाना पटोले यांची नियुक्ती काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते.

  • आक्रमक नेतृत्त्व -

गेल्या काही वर्षात राज्यातील काँग्रेस नेतृत्त्वाची भूमिका मवाळ राहिली होती. आता नाना पटोलेंच्या रुपाने एक आक्रमक नेतृत्त्व काँग्रेसला मिळाले आहे. नाना पटोले यांच्यातील आक्रमकपणा राज्यातील जनेतेने अनेकदा अनुभवला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्वांवर त्यांनी आक्रमक होऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच, मोदीलाट असतानाही भाजपला सोडणारे ते पहिले नेते ठरले होते. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा काढली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून नाना पटोले यांनी 'महापर्दाफाश' यात्रा काढली होती. यादरम्यान, स्वतंत्र भारताच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान बघितले नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे, त्यांच्या या आक्रमक स्वभावाचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

अशी आहे त्यांची राजकीय कारकीर्द -

  • 1990 - मध्ये भंडाऱ्याती संगाडी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवड
  • 1999-2014 - दरम्यान, तीनवेळा विधानसभेचे आमदार
  • 2014 - लोकसभेचे खासदार म्हणून निवड
  • 2014 - सदस्य, स्थायी समिती (विज्ञान आणि तंत्रज्ञान)
  • 2018- अखिल भारतील किसान काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवड
  • 2019 - साकोली मतदार संघातून आमदार म्हणून निवड
  • 2019 - विधानसभा अध्यक्षपदी निवड
  • 2021 - महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

Last Updated : Feb 13, 2021, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.