डर्बन SA vs IND vs 1st T20I Live Streaming : T20 विश्वचषक 2024 नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. त्यावेळी भारतीय संघानं शेवटच्या काही षटकांमध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं होतं. यावेळी ही द्विपक्षीय मालिका आहे, जी दक्षिण आफ्रिकेत खेळली जाईल. यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, तुम्ही तुमच्या टीव्ही आणि मोबाईलवर मालिकेतील सामने थेट कसे पाहू शकता हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
𝗣𝗿𝗲𝗽𝘀 𝗕𝗲𝗴𝗶𝗻! 👍👍#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/GQxM27g4lI
— BCCI (@BCCI) November 5, 2024
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामने होणार : भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 8 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने होणार आहेत. जवळपास कोणतीही मोठी T20 स्पर्धा नसली तरी, भारत आणि दक्षिण आफ्रिकेला आतापासून त्यांच्या युवा खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी आहे. अर्थात सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन संघातील आपलं स्थान पक्कं केलं असलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा खेळ कसा आहे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 27 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघानं 15 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरुन इतकं स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ T20 मध्ये आमनेसामने येतात तेव्हा ही एक रोमांचक सामना असतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं भारतासाठी इतकं सोपं नसेल.
IPL लिलावापूर्वी शेवटची संधी : विशेष म्हणजे या महिन्याच्या शेवटी IPL 2025 साठी लिलाव होणार आहे. अनेक नसतील पण नक्कीच काही खेळाडू आहेत जे या मालिकेत चांगला खेळ दाखवतील आणि IPL संघांचं लक्ष वेधून घेतील, जेणेकरुन लिलावाच्या दिवशी त्यांच्यावर मोठ्या बोली लावता येतील. तथापि, त्यापैकी बहुतेक तेच खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघानं आधीच कायम ठेवलं आहे. या मालिकेत भारतीय संघाची नक्कीच कसोटी लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा दौरा भारतासाठी कधीच सोपा राहिला नव्हता, यावेळीही असंच काहीसं घडताना दिसत आहे.
The work never stops!👊
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 7, 2024
Our boys in 🟢&🟡 are priming themselves both mentally and physically for the Inbound tour against India! 🏏
The 1st of 4 T20i’s kicks off tomorrow at Hollywoodbets Kingsmead Stadium in Durban.🇿🇦🏟️#WozaNawe #BePartOfIt#SAvIND pic.twitter.com/eNx2Swhl72
भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेत 3 T20 मालिका जिंकल्या : आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 9 T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत भारतीय संघ 4 तर दक्षिण आफ्रिकेनं 2 मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 3 मालिकाही अनिर्णित राहिल्या आहेत. भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 3 T20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकल्या आहेत आणि फक्त एक गमावली आहे. याशिवाय 1 मालिका अनिर्णित राहिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंनी केली चांगली कामगिरी : डेव्हिड मिलरनं भारतीय संघाविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरनं भारतीय संघाविरुद्ध 21 सामन्यांत 41.09 च्या सरासरीनं आणि 156.94 च्या स्ट्राईक रेटनं 452 धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर व्यतिरिक्त क्विंटन डी कॉकनं 11 सामन्यांत 43.87 च्या सरासरीनं आणि 138.73 च्या स्ट्राईक रेटनं 351 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत केशव महाराजनं 23.25 च्या सरासरीनं 12 बळी घेतले आहेत. केशव महाराज व्यतिरिक्त लुंगी एनगिडीनं 5 सामन्यांत 15.50 च्या सरासरीनं 10 बळी घेतले आहेत.
Putting in the Work😮💨
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 6, 2024
Blood, sweat and tears is what it takes to prepare to face the current T20 World Cup champions.😤💪
Our Proteas are busy preparing to face India in the first of 4 T20i’s.🇿🇦vs🇮🇳#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/MuJXixuAIc
भारतीय संघाच्या कोणत्या खेळाडूंची चांगली कामगिरी : माजी T20 कर्णधार रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 18 सामन्यांत 26.81 च्या सरासरीनं आणि 130.00 च्या स्ट्राईक रेटनं 429 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्मानं 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्माशिवाय विराट कोहलीनं 39.40 च्या सरासरीनं 394 धावा केल्या आहेत. या दोघांशिवाय सूर्यकुमार यादवनं 7 डावात 57.66 च्या सरासरीनं 346 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारनं 18.50 च्या सरासरीनं 14 आणि अर्शदीप सिंगनं 18.30 च्या सरासरीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतात कुठं दिसणार लाईव्ह सामने : या मालिकेतील सामने तुम्हाला टीव्हीवर पाहायचे असेल तर तुम्ही स्पोर्ट्स 18 वर सामना पाहू शकता, जर तुम्हाला मोबाईलवर सामना पाहायचा असेल तर तुम्ही जिओ सिनेमावर थेट सामना पाहू शकता. तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असल्यास, तुम्ही त्यावर जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करुनही सामना पाहू शकता. तसंच, तुम्ही जिओ सिनेमाच्या वेबसाइटवर मॅच लाईव्ह पाहू शकता.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार, विजयकुमार. आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोन्गवाना, नकाबा पीटर, रायन सिमेलेटोन, लुईस रिकेलटन, आणि सिपमला (तिसरा आणि चौथा) आणि ट्रिस्टन स्टब्स.
हेही वाचा :