मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा नारा गुंजताना आणि धार्मिक प्रचार होताना दिसतो आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचा ( Hindu Politics In Maharashtra ) पुनरुच्चार केल्यानंतर कोणाचे हिंदुत्व खरे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS Hindu Politics ) मराठीपणाचा मुद्दा दूर सारत हिंदुत्वाचा मुद्दाला हनुमान चालीसाच्या ( Hanuman Chalisa Issue ) माध्यमातून हात घातला आहे. मशिदीवरील भोंग्यांना ( MNS Oppose Mosque Loudspeeker ) असलेला शिवसेनेने आपला विरोध म्यान केल्यानंतर हेच मुद्दा पुढे रेटत मनसेने आपले राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.
'धार्मिक मुद्द्यांना जनता फसणार नाही' - पुरोगामी महाराष्ट्राला संत परंपरेचीची काही पार्श्वभूमी लाभलेली आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची सवय लागलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून प्रस्थापित धार्मिक ध्रुवीकरण करणारे पक्ष आहेत. मुख्यतः शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मनसे यामध्ये धर्मा-धर्मांच्या नावावरती राजकारण करण्याची चढाओढ लागलेली आहे. जो काही भोंग्यांचा प्रश्न निर्माण केला गेलेला आहे आणि त्याबद्दल जनतेला चुकीची माहिती दिली जाते. अर्धवट माहिती दिली जाते. तर आज महाराष्ट्र समोर भेडसावणारे प्रश्न काय आहे, तर महागाईमध्ये महाराष्ट्रातील जनता होरपळून निघालेली आहे. तरुणांना बेरोजगारीमुळे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तरुणांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण बघितलं काय अवस्था आहे. शिक्षण नाही. वीजेची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे महाराष्ट्रमध्ये बऱ्याच ठिकाणी विजेचे लोडशेडींग होते आहे. त्यामुळे मूलभूत प्रश्नांवर काही न बोलता धर्माच्या नावावर राजकारण हे प्रस्थापित पक्ष करत असतील. त्यांचे राजकारण करत असतील, तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातील जनता यांना काही प्रतिसाद देईल. तर महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. आमच्या जगण्याच्या प्रश्नाबद्दल या तीनही राजकीय पक्षांना काही पडलेला नाही. यांना फक्त आणि फक्त धर्माच राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, आत्तापर्यंत हे राजकारण हे करत आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांच्या या धार्मिक राजकारणाला बळी पडणार नाही, असं आम्हाला वाटतं, अशी प्रतिक्रिया 'आप'चे नेते धनंजय शिंदे यांनी दिली.
हेही वाचा - Bhagwat Geeta in Education : महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश
'महाविकास आघाडीलाच फायदा होईल' - हनुमान चालीसा आजचा महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. मशिदीवरचे भोंगे खाली करा आणि हनुमान चालीसा पठण करा, हा विषय आता जनतेसमोर राहिलेला नाही. आज गरज आहे ती प्रचंड महागाई वाढली. त्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये महागाई कशी रोखता येईल, डिझेलचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले. दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला म्हणून ओरड आठवडाभर चाललेली आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न आहे. आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आघाडी उत्तम प्रकारे काम करते आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये समस्यांचा डोंगर दिसत नाही. या सगळ्याला जबाबदार असेल तर प्रशासन आणि म्हणून द्यायचा आणि ह्यांच्या हनुमान चालीसाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारता येणार नाही. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कसे सोडवता येतील हा विषय महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने वाटचाल होणे गरजेचे आहे. पण आज कुठलाही पक्ष भाजपा व मनसे असून त्यादृष्टीने विचार करत नाही. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि भांडण-तंटा वाढवायचा कसा आणि देशांमध्ये कशी निर्माण करायची, त्यामुळे त्यांच्या भोंगे खाली करण्याच्या आणि हनुमान चालीसा पठणाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी उत्तम प्रकारे होईल. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वधर्मसमभावाचे राजकारण 50 वर्षांपेक्षा अधिक काळ करत आलेले आहेत,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सचिव दत्ताजीराव देसाई यांनी व्यक्त केली आहे.
'जनता समर्थन करेल असे वाटत नाही' - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय आपल्या दोन सभांमधून आक्रमकपणे मांडला. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 3 तारखेपर्यंतची मुदत किंवा अल्टिमेटम दिला आहे. या माध्यमातून मराठीचा मुद्दा पकडून त्यांची वाटचाल हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे हिंदुत्ववादी नेता सुरू झालेली दिसत आहे. याचा लाभ कोणाला होईल आणि कोणाला त्याचा तोटा होईल, याची चर्चा सुरू झालेली आहे. त्याला म्हणावं तसं समर्थन दिसत नाही. पुणे जिल्ह्याचे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या मुद्द्याला पहिल्यांदा विरोध केला आहे. मला माझ्या वर्गात शांतता हवी आहे, असे म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचा लाभ त्यांना कितपत होतो. ते सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केली आहे.
लिटमस टेस्ट मनपा निवडणुकांमध्ये - शिवसैनिकांबाबत विचार केला, तर यापूर्वीच शिवसेना मशिदीवरील भोंगे बंद झालेले आहे. या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होती. परंतु गेल्या काही वर्षात त्यांनी हा मुद्दा सोडून दिलेला आहे आणि ती संधी सांधत राज ठाकरे यांनी आता हा मुद्दा हाती घेतला आहे. तर संजय राऊत यांनी भाजपचा भोंगा आहे, अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर केल्यानंतर शिवसेनेने असा मुद्दा सोडला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा असो, अन्य मुद्दे पाहिले तर याचा फायदा या तिनही पक्षांना होईल, असे सध्या वाटत नाही. पण हिदुत्ववादीमते आपल्याकडे खेचण्याचा किंवा मनसेकडे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसते. पण याची लिटमस टेस्ट येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार आहे.
काय आहे हनुमान चालिसा वाद - मनसेच्या 2 एप्रिल रोजी झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याबाबद वादग्रस्त वक्तव्य केले. मशिदीच्या भोंग्यावर दिवसातून 5 वेळा प्रार्थना केली जाते. त्याचा अनेकांना त्रास होतो. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. हे भोंगे काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने टीप्पणी केली आहे. त्याची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अन्यथा मनसे मशिदीसमोर मोठे स्पिकर लावून हनुमान चालिसा लावेल, असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी राज ठाकरे यांनी पुन्हा ठाण्यात उत्तर सभा घेतली. यावेळीही आपल्या भूमिकेवर ठाम राहात राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे.