मुंबई : आर्थिक राजधानीत मुंबई पोलिसांनी बनावटी नोटा छापण्याच्या कारखान्यावर धाड (Fake Currency Printing Factory Raid Mumai) टाकली. मुंबईच्या मानखुर्द पोलिसांनी (Mumbai Mankhurd Police raid on fake currency factory) ही कारवाई केली. छापा टाकला तेव्हा मानखुर्दच्या गोठ्यात बनावट नोटा बनवण्याचे काम सुरू होते. मुंबईतील मानखुर्दचा हा परिसर पाहता इथे नोटा छापल्या जात असतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल. मानखुर्द भागातील झोपडपट्टी परिसरात बनावट नोटा बनवल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना (Mankhurd Police Station) मिळाली होती. या माहितीच्या आधारे येथे छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या कारागिरांना रंगेहात पकडण्यात (Fake Currency making Artisans arrested red handed) आले.
बनावटी नोटा छापण्यासाठी झोपडपट्टीची निवड - रोहित शहा असे या बनावटी नोटा बनविणाऱ्या प्रमुख कारागिराचे नाव आहे. रोहित मुंबईच्या कांदिवली भागात राहतो. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या मानखुर्दच्या झोपडपट्टीची निवड केली होती. रोहितने यूट्यूबवरून बनावट नोटा बनवण्याची कला शिकली. बनावट नोट खरी दिसावी यासाठी त्यांनी खऱ्या नोटेवर बारकाईने संशोधन केले. नोटा छापण्यासाठी विशेष कागद आणि शाईचा वापर करण्यात आला. 100, 200 आणि 50 अशा छोट्या चलनाचीच छपाई केली जात होती. त्यामुळे कुणालाही नोटांबाबत शंका येऊ शकत नव्हती.
घरमालकालाही कानोकान माहिती नव्हती - पोलिसांनी घटनास्थळावरून शाई, लॅपटॉप, प्रिंटर, कटर, स्टॅम्प अशा अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. रोहित गेल्या दोन महिन्यांपासून इथे बनावटी चलन छापत होता याची खाली राहणाऱ्या त्याच्या मालकिणीलाही कल्पना नव्हती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे सात लाखांच्या बनावटी नोटा जप्त केल्या आहेत. रोहितच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहितने आतापर्यंत किती बनावटी नोटा बाजारात आणल्या. त्याच्यासोबत आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.