मुंबई - स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश 347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109 जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या 108 सीमा सुरक्षा दलाच्या 19 महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42 छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे Police Medals 2022 उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत
या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश - महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने राजरत्न खैरनार राजू कांडो अविनाश कुमरे संदीप भांड मोतीराम माडवी दामोदर चिंतुरी राजकुमार भालावी सागर मूल्लेवार शंकर माडवी रमेश असम महेश सयम साईकृपा मिरकुटे रत्नाय्या गोरगुंडा मनीष कलवानिया भाऊसाहेब ढोले संदीप मंडलिक दयानंद महादेश्वर जीवन उसेंडी राजेंद्र माडवी विलास पाडा मनोज इसकापे समीर शेख मनोज गजमवार अशोक माजी देवेंद्र पखमोडे हर्षल जाधव स्वर्गीय जगदेव मांडवी सेवाक्रम माडवी सुभाष गोमले रोहित गोमले योगीराज जाधव धनाजी होनमाने दसरू कुरसामी दीपक विडपी सुरज गंजीवार दिवंगत किशोर अत्राम गजानन अत्राम योगेश्वर सदमेक अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे पोलिसांना त्यांच्या सेवेतील सर्वोत्कृष्ट कर्तव्य बजावतांना केलेल्या सेवेबाबत केंद्र सरकार शौर्य पुरस्कार प्रदान करीत असते महाराष्ट्राने यंदा देखील चांगली कामगिरी बजावत पोलीस दलाची मान उंचावली आहे
हेही वाचा - Vinayak Metes Death विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे जे जे रुग्णालयात होणार शवविच्छेदन