मुंबई - आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली. त्यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत शिरीष कुमार शेडगे (वय-३८) व निलम जाधव (वय-३६) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ही महिला घाटकोपर पश्चिम येथील अब्दुल कादरी चाळीत खोली भाड्याने घेऊन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक - वेश्या व्यवसाया बद्दल बातमी
आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.