ETV Bharat / city

रेमडेसीवीर काळाबाजार: एफडीए आणि पोलीस करणार एकत्रित कारवाई - FDA on remdesivir supply

काळाबाजाराच्या तक्रारी आमच्याकडे अद्याप आलेल्या नाहीत. पण संबंधितानी पुढे येऊन तक्रार केली तर त्वरित कारवाई करू, असे एफडीएचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले.

 रेमडेसीवीर
रेमडेसीवीर
author img

By

Published : Jul 10, 2020, 10:41 PM IST

मुंबई - कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने आज (एफडीए) फेटाळला. मात्र, एफडीएने काही तासातच काळाबाजाराच्या तक्रारीविरोधात पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

काळाबाजाराच्या तक्रारी आमच्याकडे अद्याप आलेल्या नाहीत. पण संबंधितानी पुढे येऊन तक्रार केली तर त्वरित कारवाई करू, असे एफडीएचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसापांसून राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा आहे. कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार होत असल्याची नागरिकांमधून ओरड होत आहे. तर यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एफडीएकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच एफडीएने काळाबाजार नसल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे जबाबदारी झटकली होती.

रेमडेसीवीरचा काळाबाजार होत असल्यावरून वादळ होण्यापूर्वी अखेर एफडीएने कारवाई करू, असे जाहीर केले आहे. मंत्रालयात एफडीए आणि गृह विभाग यांच्यात आज संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत पोलीस आणि एफडीएने रे मेडेसीवीरच्या काळाबाजारच्या तक्रारीविरोधात एकत्रित कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उन्हाळे यांनी दिली आहे. तर नागरिकांनी पुढे यावे आणि तक्रारी कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय म्हणाले होते एफडीएचे आयुक्त?

एफडीएचे सर्व अधिकारी इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या वितरक, रुग्णालये या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. अद्याप आम्हाला कुठेही काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आलेले नसल्याचे उन्हाळे यांनी सांगितले. तसेच एकही तक्रार आली नसल्याची त्यांनी माहिती दिली आहे. रेमेडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता वाढावी, यासाठी कंपन्यांकडे अधिक साठ्याची मागणी केली आहे. काळाबाजार होत नाही, पण मुंबई व राज्यात मागणीच्या तुलनेत रेमडेसीवीरचा पुरवठा कमी होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.