ETV Bharat / city

'भारत बंद' : मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - bharat band agitation in mumbai

शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

bharat band protest in mumbai
'भारत बंद' : मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
author img

By

Published : Dec 7, 2020, 7:15 PM IST

मुंबई - शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

'भारत बंद' : मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
मुंबईतील संवेदनशील परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बळ देण्यात आले असून मुंबईत असलेल्या 4 हजार 800 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या प्रत्येक पोलीस ठाण्याला अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ देण्यात आले आहे. 'भारत बंद'च्या दिवशी कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यात आली आहेत. कुठल्याही ठिकाणी कोणतीही आस्थापने, दुकाने किंवा इतर गोष्टी बळजबरीने बंद करणार्‍यांच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या बरोबरच कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता शहरात या अगोदरच 144 कलम लागू करण्यात आले आहे.

ऑपरेशन 'ऑल आऊट' अंतर्गत 22 तडीपार आरोपीना अटक

मुंबई पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट या मोहिमेदरम्यान शहरातील तब्बल 22 तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान केलेल्या कारवाईदरम्यान 22 तडीपार आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशन दरम्यान गंभीर गुन्ह्यातील पोलिसांच्या अभिलेखावर असलेले 362 गुन्हेगार तपासण्यात आले असून अमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या कारवाई दरम्यान 52 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 44 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई शहरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 48 फरार गुन्हेगारांचा शोध घेत या ऑपरेशन दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.