ETV Bharat / city

Pod Hotel Mumbai : जपानच्या धर्तीवर बनवलेले देशातील पहिले पॉड हॉटेल; मुंबईच्या प्रवाशांसाठी दिलासादायक - ETV Bharat

लांबपल्ल्याच्या गाड्यांतून मुंबईत ( mumbai ) येणाऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या कालावधीसाठी निवास करण्यास अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रिक्षा, टॅक्सी चालकांसोबत वाद निर्माण व्हायचे. जेथे निवासस्थान असायचे, तेथे जास्त पैसे आकारले जायचे. रेल्वेने प्रवास करुन आलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने आता मुंबईत तात्पुरत्या निवासाची सोय उपलब्ध केली आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनचे Pod Hotel Mumbai बनविले असून यात प्रशस्त बाथरूमची सोय करण्यात आली आहे.

Pod Hotel Mumbai
देशातील पहिले असलेल्या पॉड हॉटेलचा आढावा
author img

By

Published : Nov 23, 2021, 7:46 AM IST

मुंबई - परराज्यातून मुंबई ( mumbai ) गाठल्यानंतर तात्पुरत्या निवासाचा यक्षप्रश्न प्रवाशांसमोर असायचा. पश्चिम रेल्वेने जपानच्या धर्तीवर प्रवाशांकरीता देशातील पहिले पॉड हॉटेल ( First pod hotel in the India ) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ( Mumbai Central Railway Station ) सुरु केले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना येथील सोयी सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे, अशी भावना प्रवाशांनी ईटीव्ही भारतकडे ( ETV Bharat ) व्यक्त केली.

देशातील पहिले असलेल्या पॉड हॉटेलचा आढावा

कमी खर्चिक मात्र आधुनिक सुविधायुक्त डिझाईनचे पॉड -

लांबपल्ल्याच्या गाड्यांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या कालावधीसाठी निवास करण्यास अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रिक्षा, टॅक्सी चालकांसोबत वाद निर्माण व्हायचे. जेथे निवासस्थान असायचे, तेथे जास्त पैसे आकारले जायचे. रेल्वेने प्रवास करुन आलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने आता मुंबईत तात्पुरत्या निवासाची सोय उपलब्ध केली आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनचे पॉड हॉटेल बनविले असून यात प्रशस्त बाथरूमची सोय करण्यात आली आहे. जपान, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स अशा सर्व मोठ्या देशांमध्ये पॉड हॉटेल्स चालतात. पश्चिम रेल्वेने याच धर्तीवर मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये पॉड हॉटेल तयार केले आहे. खाद्यपदार्थ खाण्यास येथे मनाई आहे. तसेच चप्पल, शूज घालून येथे जाण्यास बंदी असून स्वच्छता राखण्यावर भर दिल्याचे अर्बन पॉडचे जनरल मॅनेजर अजय पंडित यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

भिंतीवर मुंबईचे जनजीवन रेखाटले -

व्यवसायानिमित्त, शैक्षणिक सहलीसाठी, सोलो ट्रिप किंवा बॅकपॅकर्ससाठी हे पॉड हॉटेल्स उत्तम पर्याय आहेत. कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींच्या गप्पांसाठी विशेष सुविधा तयार केली आहे. पॉडच्या भिंतीवर मुंबईचे जनजीवनाचे चित्र रेखाटण्यात आले आहे. मुंबईत आल्यानंतर त्याचा फिल यावा, हा यामागचा मानस असल्याचे पंडित म्हणाले. खाजगी कंत्राटदारामार्फत ९ वर्ष देखभालीच्या तत्वावर हॉटेल चालवण्यासाठी दिले आहे.

अशी आहे सुविधा -

पॉड हाॅटेलमध्ये एकूण ४८ पॉड (रूम) आहेत. यामधील ३० क्लासिक पाॅड, ७ पाॅड फक्त महिलांसाठी, १० खासगी पाॅड, एक अपंगासाठी आहे. यासह पाच शाॅवर युनिट लावले असून 4 कुटुंब सदस्य असलेल्या कुटुंबाला देखील निवासासाठी सुविधा येथे उपलब्ध करून दिली आहे. मनोरंजनासाठी वॉयफाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही लावले आहेत. तसेच वातानुकुलित रूम, विद्युत दिवे, छोटेखानी लॉकर असून हवेशीर जागा, डिझाईन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर आदी सुविधा दिल्या आहेत. परवडणाऱ्या दरात पॉड उपलब्ध होणार आहेत. १२ आणि २४ तासांसाठी चेक इन- चेक आऊटची वेळ असणार आहे. १२ तासांसाठी किमान सातशे रुपये मोजावे लागणार आहेत. तर २४ तासांसाठी दीड ते सतराशे रुपये प्रति व्यक्तीला आकारले जाणार आहेत.

ऑनलाईन, ऑफलाईन बुकिंग सुविधा -

रेल्वे प्रवाशांकरिताच ही सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांना पॉड बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा देखील कार्यान्वित केली आहे. दोन्ही बुकिंगसाठी तिकीटचा पीएनआर नंबर बंधनकारक असेल. चालू तिकीटवरही बुकिंग करता येईल. मात्र तिकीटवरील एसएसीनंबर ग्राह्य धरला जाईल, असे पंडित यांनी स्पष्ट केले.

सुरक्षित ठिकाण -

मुंबईत येण्याची तिसरी वेळ. दोन वेळा राहण्यासाठी हॉटेल्स शोधावे लागले. टॅक्सी वाल्यासोबत त्यात ही वाद झाले. रेल्वेने पॉट हॉटेल्स तयार केल्याने माझ्या सारख्या एकट्या प्रवाशाला दिलासा मिळाला आहे. रेल्वे सुरक्षित आहे. त्यामुळे कसलेही दडपण येत नाही. नातेवाईकांनी माहिती देण्यास ही सोयीस्कर ठरतेय, असे अक्षय सन्ना या प्रवाशांने सांगितले.

हेही वाचा - POD HOTELS RATE जाणून घ्या, मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या पॉड हॉटेलचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.