मुंबई - शेतकरी आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण हे इंटलीजन्स फेलियर असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 60 दिवस शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. मात्र या आंदोनाला हिंसक वळण लागले याची पूर्व कल्पना सरकारला नव्हती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालयाला चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनावर मार्ग काढण्यात सरकारला अपयश
केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत केवळ चर्चा करत राहिले, मात्र त्या चर्चेतून कोणताही मार्ग काढण्यात सरकारला यश आलं नसल्याची टीका देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वेळीच शेतकऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असती, तर ही परस्थिती उद्भवली नसती असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. तसेच केंद्राने केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.