मुंबई : मुंबईमधील रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात. खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी मार्गी (Pits free Mumbai) लावण्यासाठी पालिकेने काँक्रीटीकरणावर भर दिला आहे. मुंबईतील रस्ते काँक्रीटचे (5800 crores contract of municipality for concreting of roads) करण्यासाठी पालिकेने ५ हजार कोटींचे टेंडर (BMC Street Tender) काढले आहेत. यामध्ये मोठ्या कंपन्या सहभागी होतील; अश्या अटी-शर्ती लावण्यात आल्याने, मुंबईकरांना चांगले रस्ते मिळतील. असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त : मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने, महापालिकेवर टीका होते. ही टीका टाळण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षात काँक्रीटचे रस्ते बनवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली आहे. या दरम्यान रस्त्यावर खड्डे दिसायला नकोत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यावेळी पालिकेकडून रस्ते काँक्रीटचे केले जात असून; येत्या दोन वर्षात सर्व रस्ते काँक्रीटचे केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती.
५८०० कोटींची टेंडर : रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या कामासाठी पालिकेने ५ टेंडर काढली आहेत. ५८०० कोटींची ही टेंडर आहेत. पालिकेच्या कामात मोठ्या कंपन्या सहभागी होत नव्हत्या. यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या कंपन्या सहभागी झाल्याने; नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळतील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. पालिकेने ९८९ किलोमिटरचे रस्ते काँक्रीटचे केले आहेत. सध्या २३६ किलोमीटरचे काम केले जात आहे. आणखी ४०० किलोमीटरचे काम केले जाणार आहे.