मुंबई सध्या पितृपक्ष सुरू आहे मात्र पितृपक्षात अनेक वेळा महत्त्वाची काम करू नये, असा गैरसमज जनसामान्य आणि नेते मंडळींमध्ये देखील पाहायला मिळतो. अनेकवेळा नेतेमंडळी महत्त्वाची काम पितृपक्षामध्ये करत नाहीत. मात्र पितृपक्ष अशोक नसून शुभ असल्याचे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ सांगितले आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अनेक जुन्या रूढी परंपरा बाजूला सारत महाराष्ट्राने नव्या विचारांना जवळ केलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक गोष्टी पडताळल्या देशातल्या इतर राज्यात महाराष्ट्र निर्मित पुरोगामी राहिला. याचा सातत्याने उल्लेख महाराष्ट्राच्या राजकीय नेते मंडळीच्या भाषणातून होताना देखील आपण पाहतो. Fear In Hearts Political leaders मात्र असं असलं तरी अनेक अनिष्ट परंपरा अद्यापही सुरू आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षात चांगलं काम करू नये, अशा प्रकारची धारणा अद्यापही अनेकवेळा आपण समाजात असलेली पाहिला मिळते. खास करून राजकीय नेतेमंडळी महत्त्वाची काम या पितृपक्षामध्ये करत नाहीत, असे अनेकवेळा निदर्शनास आला आहे.
पितृपक्ष असल्यामुळे मंत्री पदभार घेत नाहीत एकनाथ शिंदे यांचा सरकार राज्यांमध्ये अस्तित्वात येऊन जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. तसेच ज्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यांना खाते देण्यात आलेले आहे. त्यापैकी अनेक मंत्र्यांनी अद्यापही संबंधित खात्याचे काम सुरू केलेलं नाही. पितृपक्ष असल्यामुळेच काही मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये असे वागणे योग्य नाही, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्र्यांना लगावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पितृपक्षामुळे मंत्री पदभार स्वीकारत नसल्याची टीका राज्य सरकारवर केली आहे. त्यामुळे पितृपक्षाचा किती भय सामान्य जनतेसोबतच नेते मंडळींमध्ये देखील आहे. हे यावरून निदर्शनास येते. अनेकवेळा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना पितृपक्षात ते अर्ज भरले जाऊ नये, याची दक्षता नेतेमंडळी कडून घेतली गेलेले पाहायला मिळते. पितृपक्ष संपताच नेतेमंडळी आपला उमेदवारी अर्ज फॉर्म भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतानाची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते मंडळीच्या मनातही पितृपक्षा बाबत भय असलेलं नेहमीच पाहायला मिळाला आहे.
पितृपक्ष अशुभ नाही पितृपक्ष हे अशुभ नाही आपल्या मित्रांची आठवण करणे त्यांचं श्राद्ध केले पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात धान्य तयार होते. यासाठी पृथ्वीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर पुढील पंधरा दिवस ज्यांनी आपल्याला जमीन दिली, शिक्षण दिले, त्यांच स्मरण करण्यासाठी पितृपक्ष केला जातो. त्यानंतर नवरात्रीत धान्य तयार होतं आणि नवनिर्मितीची पूजा केली जाते. त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध हे श्रद्धेने केले जात. यामध्ये काहीही अशुभ नाही असं मत जोतिष शास्त्र आणि खगोल शास्त्र अभ्यासक दा कृ सोमण यांनी व्यक्त केल आहे.
खगोलशास्त्रानुसार 23 सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तात येतो आणि दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. उत्तर गोलार्ध हा देवांचा तर दक्षिण गोलार्ध हा पितरांचा असा समज आहे. मात्र पितृपक्ष हा वाईट नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही पितृपक्षात कोणतेही काम मनमोकळेपणाने करावं. जनतेची सेवा करणे हे सर्वात चांगलं काम असतं, त्याच्यामुळे या पितृपक्षात जर जनतेची सेवेचा काम नेतेमंडळी करतील. तर त्यांना आपल्या मित्रांचा आशीर्वादच मिळेल, असं मत खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण यांनी व्यक्त केला आहे. पितृपक्षा बाबत अनेक समज गैरसमज लोकांमध्ये आहेत. ते गैरसमज दूर होणं देखील तेवढेच महत्त्वाचा असल्याचा सोमन यांनी सांगितले आहे.