ETV Bharat / city

महिलेची हत्या करणाऱ्या नशेबाज अपंग आरोपीला 4 तासात अटक - jj road murder

मंगळवार 17 सप्टेंबरला ही घटना घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास करीत असगर अली (33) या आरोपीला अटक केली आहे.

महिलेची हत्या करणाऱ्या नशेबाज अपंग आरोपीला 4 तासात अटक
author img

By

Published : Sep 17, 2019, 8:28 PM IST

Updated : Sep 17, 2019, 11:53 PM IST

मुंबई - नशा केल्यानंतर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका महिलेचा खून करणाऱ्या अपंग आरोपीला घटनेनंतर केवळ चार तासातच जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार 17 सप्टेंबरला ही घटना घडली होती.

संग्रामसिंह निशानदार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1 यांची प्रतिक्रिया

जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटपाथवर राहणाऱ्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बाबूला टँक रोड येथे धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना एका महिलेच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने घाव घालून हत्या केल्याचे लक्षात आले. या संदर्भात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मृत महिलेसोबत पहाटेच्या वेळेस एक अपंग व्यक्ती रस्त्यावर फिरत असताना आढळून आली.

हेही वाचा - धक्कादायक! गोवंडीत विद्यार्थ्याने शिक्षकेची भोसकून केली हत्या

या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास करीत असगर अली (33) या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नशेच्या आहारी गेला असून घटनेच्या दिवशी मृत महिला व आरोपीने अमली पदार्थांचे सेवन केले होते. अटकेतील आरोपी जे जे मार्ग परिसरात राहत असून बाबूला टँक रोडवरील फुटपाथवर राहत असणाऱ्या महिलेशी त्याची ओळख झाली होती.

हेही वाचा -बोरिवलीत मगरीच्या पिल्लांची तस्करी; वनक्षेत्रपाल पथकाच्या कारवाईत तिघांना अटक

सोमवारी रात्री अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर या दोघात वाद झाला होता. आरोपी असगर अली याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा मृत महिलेजवळ जाऊन भांडणाला सुरुवात केली. यावेळी महिलेने रागाच्या भरात त्याच्या कानाखाली वाजवली होती. या प्रकाराने संतापलेल्या असगर अलीने बाजुला पडलेला प्लेवर ब्लॉक तिच्या डोक्यात घालत तिची हत्या केली. हत्या झालेली महिला फुटपाथवर राहत असल्याने अद्याप तिची ओळख पटवता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:नशा केल्यानंतर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला हत्येच्या घटनेनंतर केवळ चार तासातच जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार 17 सप्टेंबर रोजी पहाटे जेजे मारग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटपाथ वर राहणाऱ्या एका अनोळखी महिलेची मृतदेह रस्त्यावर पडल्याची सूचना पोलिसांना मिळताच पोलिसांनी बाबूला टॅंक रोड येथे धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना पेव्हर ब्लॉक ने डोक्यावर घाव घालून ठेचून हत्या केल्याचे लक्षात आले. या संदर्भात पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी तपासले असता मयत महिलेसोबत पहाटेच्या वेळेस एक अपंग व्यक्ती रस्त्यावर फिरत असताना आढळून आली. Body: या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास करीत असगर अली (33) या आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपी हा सुद्धा नशेच्या आहारी गेला असून घटनेच्या दिवशी मयत महिला व आरोपीने अमली पदार्थांचे सेवन केले होते.अटक आरोपी जे जे मार्ग परिसरात राहत असून बाबूला टॅंक रोड वरील फुटपाथवर राहत असणाऱ्या मयत महिलेशी त्याची ओळख झाली होती. सोमवारी रात्री अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर या दोघात वाद झाला होता. आरोपी असगर अली याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा मयत महिलेजवळ जाऊन भांडणाला सुरुवात केली. यावेळी महिलेने रागाच्या भरात त्याच्या कानाखाली वाजवली या प्रकाराने संतापलेल्या असगर अली ने बाजुला पडलेला प्लेवर ब्लॉक तिच्या डोक्यात घातला आणि त्याच प्लेवर ब्लॉक ने तिची हत्या करून तिचा चेहरा विद्रुप केला..हत्या झालेली महिला फुटपाथवर राहत असल्याने अद्याप तिची ओळख पटवता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले..

(बाईट - संग्रामसिंह निशानदार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1 ) Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.