मुंबई - पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पीएफआय संघटनेच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई केली जाणार नाही. अशा देश विरोधी कृत्याच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. या संघटनेचा सेमी संघटनेची देखील संबंध असल्याचे समजत आहे. मात्र, ही कारवाई या आधीच होणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा - देश पातळीवर पीएफ संघटना काम करतेय. त्यामुळे गेल्या दोन वर्षात पी एफ आय संघटना ही देशभरात वाढलेली नाही असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केल आहे. तसेच, रजा अकादमी विरोधात देखील काही पुरावे असतील तर केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा असे मतही दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत धोरण काय - राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण देणार का? हे सरकारने जाहीर करावे. राज्यात मुस्लिम समाजाचा सर्वे होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, सर्वे करण्याआधी राज्य सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत नेमके काय धोरण आखले आहे असा प्रश्न वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राजकारण कोणीही करू नये - लव जिहादला कोणाचाच पाठिंबा नाही. राज्यामध्ये लव जिहाद विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. यावर बोलतानाही दिलीप वळसे पाटील म्हणाले की, लव्ह जिहादला कोणीही पाठिंबा देणार नाही. मात्र, लव्ह जिहादलाच्या नावाखाली सध्या मोठे राजकारण सुरू आहे. ते राजकारण कोणीही करू नये असही वळसे पाटील म्हणाले आहेत.