नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शनिवारीही देशात इंधनाचे दर चढेच राहिले. देशभरातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या पुढे गेले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मागील आठवड्यात इंधनाच्या दरात सतत वाढ झाली.
सर्वात जास्त इंधन दर असणारे चार जिल्हे -
विविध जिल्ह्यातील इंधनाचे दर (प्रति लिटर) -
- परभणी - पेट्रोल 99.01 डिझेल - 88.39
- औरंगाबाद - पेट्रोल 97.48 डिझेल - 86.80
- रत्नागिरी - पेट्रोल - 98.22 डिझेल - 87.89
- हिंगोली - पेट्रोल- 97. 87 स्पीड पेट्रोल- 100. 70 डिझेल-87. 59
- नंदुरबार - पेट्रोल - 97.65 स्पीड पेट्रोल - 100.48 डिझेल - 87.39
- जळगाव - पेट्रोल 98.05 डिझेल 87.74