ETV Bharat / city

Loudspeakers On Mosque : मुंबईतील ८०३ मशिदींवरील भोंग्यांना मुंबई पोलिसांकडून परवानगी - Mumbai Police Grants Permission Mosque Loudspeakers

राज्यात भोंग्यांवरून वातावरण तापलेले असताना आता मशिदींकडून भोंग्यांच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात येत ( Loudspeaker Permission Application ) आहेत. मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या ८०३ मशिदींवरील भोंग्यांना परवानगी दिली ( Mumbai Police Grants Permission Mosque Loudspeakers ) आहे.

Mumbai Police Grants Permission Mosque Loudspeakers
मुंबईतील ८०३ मशिदींवरील भोंग्यांना मुंबई पोलिसांकडून परवानगी
author img

By

Published : May 3, 2022, 8:04 PM IST

मुंबई : राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्यानंतर राज्य सरकारने धार्मिक स्थळांवर, मशिदीवर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचे ( Loudspeaker Permission Application ) सांगितले. त्यानंतर मुंबईत मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागण्यात आली आली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी ८०३ मशिदीवरील भोंगे लावण्यासाठी परवानगी देण्यात आली ( Mumbai Police Grants Permission Mosque Loudspeakers ) असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली ( Mumbai CP Sanjay Pandey ) आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये १ हजार १४४ मशिदी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८०३ मशिदीवरील भोंगे लावण्याची परवानगी देण्यात आली असून, इतर मशिदी संदर्भात परवानगी देण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सर्वांना परवानगी देण्यात येत आहे. तसेच ध्वनि प्रदूषणाच्‍या नियमांचे पालन करत सर्वांनी मशिदीवरील भोंगे वाजवणे बंधनकारक असणार आहे. मुंबई पोलिसांकडून सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच या मशिदीवरील भोंगे वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर कुणी नियमाचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यानंतर राज्य सरकारने कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे लावण्याकरिता पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भोंग्यांच्या आवाजासंदर्भात काही मर्यादादेखील आखून देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या धार्मिक स्थळावर पोलिसांकडून आखून देण्यात आलेल्या मर्यादा भंग करण्यात आल्या तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाण्यातील सभेतही राज ठाकरे यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. आज ही मुदत संपणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात अनेक पदाधिकाऱ्यांना 149 ची नोटीस देखील देण्यात आली आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : चिथावणीखोर भाषण भोवले.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, 'असे' आहे संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.