मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विलेपार्ले आणि चरणी रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी आजपासून खुले करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ( Mumbai railway Vikas corporation) दिली आहे.
चर्नी रोड रेल्वे स्थानक- एमआरव्हीसीने दिलेल्या माहितीनुसार, चर्नी रोड स्थानकातील नवीन तयार करण्यात आलेल्या पादचारी पूल हा 30 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद ( pedestrian bridge at Charney Road ) आहे. विशेष म्हणजे या पादचारी पुलावर रेल्वे तिकीट घर ( railway ticket house ) उभारण्यात आले आहे. याशिवाय चर्नी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म ( Charni Road station ) क्रमांक 1 ते पूर्व बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पादचारी पूल आणि फलाट क्रमांक 4 जोडण्यात आलेला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 उत्तरचा दिशेने 3. 4 मीटर रुंद जिना तयार करण्यात आलेला आहे. यामुळे पूर्वी मोठ्या प्रमात प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत होते. आता नवा पादचारी पूल तयार झाल्याने रेल्वे रूळ ओलांडणे बंद होणार आहे.
2.8 कोटी रुपयांचा खर्च- पश्चिम रेल्वे मार्गावरील विलेपार्ले स्थानकातील मध्यभागी असलेला नवा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे. नवीन पादचारी पुलाची लांबी 55 मीटर आणि रुंदी 6 मिटर आहे. या नव्या पादचारी पूल उभारण्यासाठी 2.8 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. हा नवीन पादचारी पूल फलाट क्रमांक 1, 6 फलाट क्रमांक 2, 3, 4 तसेच 5 आणि 6 यांना जोडणारा आहे.
एमआरव्हीसीकडून प्रवाशांना आवाहन- मुंबई उपनगरातील रेल्वे प्रवासाची वेळ वाचविण्याकरिता आज सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे अपघातात घडत असते. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे रूळ ओलांडणेच्या ठिकाणी पूल उभारण्यात येत आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा वापर करावा. रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आव्हान एमआरसीव्हीकडून प्रवाशांना करण्यात आलेले आहे.
हेही वाचा-टीबीच्या लसींची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी चाचण्या
हेही वाचा-Samrudhi Mahamarg:समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण मुख्यमंत्री घेणार आढावा
हेही वाचा- ED Arrested Satish Uke : वकील सतीश उके यांना जामीन की कोठडी? मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू