मुंबई- माझी पत्रा चाळवासियांना हात जोडून विनंती आहे, आपल्या हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गोरेगाव मधील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
म्हणून आजचा दिवस उजाडतो
संघर्ष समितीला हा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करत आहोत. अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज आपण साधत आहोत. उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कामाचा पिच्छा पुरवला. देसाई सतत कॅबिनेटमध्ये हाच विषय काढत असायचे. एक एक जण असा मागे लागला म्हणून आजचा दिवस उजाडतो, अशी आठवण मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून दिली.
घर विकून पूर्वजांनी केलेला संघर्ष विसरू नका
अनेक जण पोटापाण्यासाठी मुंबईत येतात. त्यांचे किमान हक्काचे घर असावे हे स्वप्न असते. तशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीने आजचा शुभ दिन आहे. चिकाटी आणि जिद्द असली की काहीही करता येते, हे या कामातून दिसून येते. येथील सर्वांना लवकरच घर सुद्धा मिळेल. मिळालेले घर विकून पूर्वजांनी केलेला संघर्ष विसरू नका. घरात पाऊल टाकताना त्या प्रत्येकाचे स्मरण ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
घर झाल्यानंतर चहाला बोलायला विसरु नका
आज तुमच्या हक्काच्या घराचे भूमिपूजन होत आहे. लवकरच घर मिळेल, परंतु, कृपा करून हक्काचे घर सोडू नका, ही माझी विनंती आहे असे समजा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तसेच या कामांसाठी ज्यांचे सहकार्य लागले त्यांना मनापासून धन्यवाद दिले. घर झाल्यानंतर चहाला बोलायला विसरु नका, असे मिश्किल भाष्यही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिममध्ये पत्रा चाळच्या ६७२ कुटुंबांच्या घरांच्या कामाचे उद्घाटन ( Inauguration of homes for Patra Chawl ) करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president at Patra Chawl ), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदी नेते मंडळी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळला भेट दिली.
१२ वर्षांपासून रखडला पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न-
महाराष्ट्र पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी म्हाडाची बहुप्रतिक्षित योजना सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळला भेट दिली. सुमारे १२ वर्षांपासून रखडलेल्या पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना देण्यात आला आहे. तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर महिनाभरानंतर आव्हाड स्वत: या प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा घेणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाकडून निघणाऱ्या लॉटरीत महाराष्ट्र पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव ठेवण्यात येणार ( reserve homes for Maharashtra Police ) असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
काय होती योजना?
२००७ मध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारने मार्च २०१८मध्ये माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली होती. पत्रा चाळ पुनर्विकासाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील म्हाडाच्या लेआउटमध्ये एचडीआयएल समूहाचा भाग असलेल्या गुरुशिष कन्स्ट्रक्शनद्वारे पुनर्विकास केला जात होता. जानेवारी २०१८ मध्ये, म्हाडाने एचडीआयएल समूहाचा एक भाग असलेल्या विकासक गुरुशिष कन्स्ट्रक्शन्सला वेळेवर पुनर्विकास पूर्ण न केल्यामुळे ते सोडण्याच्या आदेशासह टर्मिनेशन नोटीस जारी केली होती. गुरुशिष कन्स्ट्रक्शनने या जागेच्या पुनर्विकासासाठी म्हाडा आणि पत्रा चाळमधील रहिवाशांशी करार केला होता आणि आजपर्यंत हा प्रकल्प अपूर्ण आहे. पुनर्विकासात म्हाडाला विकासकाकडून १ लाख चौरस फूट क्षेत्रफळ मिळणार होते.
हेही वाचा - नागपुरात नाना पटोले : भाजपला स्वत:ला घालवणार असेल तर विरोध करायचा - नाना पटोले