ETV Bharat / city

मुंबई : पोलिसाच्या सर्तकतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण - Mumbai News Update

रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचे पोलिसाच्या सर्तकतेमुळे प्राण वाचले आहे. ही घटना शुक्रवारी दहीसर रेल्वे स्टेशनवर घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलिसाच्या सर्तकतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

author img

By

Published : Jan 2, 2021, 8:56 PM IST

मुंबई- रेल्वेने अथवा लोकलने प्रवास करत असताना योग्य ती सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. अन्यथा एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. अनेकदा प्रवासी लोकलने प्रवास करताना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रिजचा वापर करण्याऐवजी रेल्वे ट्रॅकचा वापर करतात. यामुळे अनेकदा त्यांना जीव गमवावा लागतो. असाच एक प्रकार काल मुंबईतील दहिसर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. याठिकाणी एका व्यक्तीने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा वापर केला, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला आहे.

पोलिसाच्या सर्तकतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

पोलिसाच्या सर्तकतेमुळे वाचले प्राण

याबाबत अधिक माहिती अशी की, खारला जाणारी लोकल दहिसर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत होती. ही लोकल पकडण्यासाठी हा व्यक्ती प्लॅटफॉर्म 4 वरून प्लॅटफॉर्म 2 कडे गेला. मात्र त्याने प्लॅटफाॅर्म 2 वर जाण्यासाठी ब्रीजचा वापर न करता रेल्वे ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान प्लॅटफॉर्म 3 वर विरारकडे जाणारी लोकल येत असल्याने हा प्रवासी मध्येच अडकला. तो प्रवासी प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला चढता येत नव्हते. यावेळी रेल्व स्थानकावर हजर असलेले पोलीस कर्मचारी एसी बी निकम यांच्या ही घटना लक्षात आली, त्यांनी स्व:ताचा जीव धोक्यात घालून या प्रवाशाचे प्राण वाचवले. गणपत बेहरजी सोलंकी असे या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, निकम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.