ETV Bharat / city

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलचे पास मिळणे झाले कठीण - corona update

काेराेना प्रतिबंधक लसीच्या दाेन मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करुन रेल्वेचा पास देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दीड लाखापेक्षा पासची विक्री झाली. मात्र, याच बरोबर आता अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लसवंताप्रमाणचे काेराेना प्रतिबंधक लसीचे प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे.

लोकलचे
लोकलचे
author img

By

Published : Aug 17, 2021, 7:02 AM IST

मुंबई - कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सुद्धा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील रेल्वे कर्मचारी विचारत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शासनाने लिहले होते पत्र
काेराेना प्रतिबंधक लसीच्या दाेन मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करुन रेल्वेचा पास देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दीड लाखापेक्षा पासची विक्री झाली. मात्र, याच बरोबर आता अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लसवंताप्रमाणचे काेराेना प्रतिबंधक लसीचे प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तिकीट आणि पास घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सुद्धा आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 5 ऑगस्ट रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पास आणि तिकिट मिळत नसल्याने खंत व्यक्त केली होती.

पास मिळता मिळेना
रेल्वेने सुद्धा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकिट खिडकीवर पास आणि तिकीट मिळावे, यासाठी तिकीट खिडक्यावर सूचना दिल्या आहे. मात्र, लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा दिल्याने पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीच्या प्रमाणपत्राची विचारपूस केली जात आहे.तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ओळ्खपत्राची शहानिशा झाल्याशिवाय पास देत नाहीत. खासगी वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात. त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सर्रास त्यांना तिकीट खिडक्यांवर लसीच्या प्रमाणपत्राची विचारपूस केली जात आहेत आणि प्रमाणपत्र नसल्याने त्यांना पास मिळत नाही आहे. तिकीट खिडकीवर त्यांना पास नाकारून फक्त तिकीट दिली जात आहे. त्यामुळे खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दररोज त्यांना तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

रेल्वेच्या कारभारावर नाराजी-
अत्यावश्यक सेवेत काम करणारे राकेश जोगडे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की,जेंव्हापासून लसवंतांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकीट खिडक्यांवर लसीच्या प्रमाणपत्राची विचारपूस केली जात आहे. त्यांना शासकीय ओळखपत्र दाखवून विश्वास बसत नाही. त्यामुळे आम्हाला तिकीट दिली जाते. त्यामुळे शासनाने तात्काळ यात लक्ष घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचे तिकीट आणि पास तत्काळ मिळावेत, असे आदेश द्यावेत,अशी मागणी सुद्धा राकेश यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.