ETV Bharat / city

मराठा आरक्षणा बाबत पार्थ पवारांच्या ट्वीटने पुन्हा एकदा खळबळ, म्हणाले... - पार्थ पवार ट्विट

मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ट्विट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राम मंदिरा बाबत ट्वीट करत शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली होती.

parth pawar tweet
अन्यथा माझाकडे पर्याय खुला...पार्थ पवारांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण!
author img

By

Published : Oct 1, 2020, 10:18 AM IST

Updated : Oct 1, 2020, 12:45 PM IST

मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ट्विट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विवेकची आत्महत्या सर्वांचा विचार करायला लावणारी आहे. एका पिढीचे भवितव्य पणाला लागले आहे. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. असे ट्वीट पार्थ यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ यांनी राम मंदिरा बाबत ट्वीट करत शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली होती.

  • Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0

    — Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर समाजात अस्वस्थता वाढली आहे. विविध ठिकाणी यासाठी बैठका पार पडत असून मराठा समाजाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. यातच बीडमधील एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर येताच वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. आता पार्थ पवार यांनीही संबंधित मुलाच्या मृत्यूचा दाखला देत मराठा आरक्षणासंदर्भात ट्विट केले आहे.

'मराठा सामाजाच्या आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचे सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागे होण्याची गरज असून आरक्षणासाठी लढायला हवे. महाराष्ट्र सरकारनेही यात तत्काळ लक्ष घालावे,' असं पार्थ यांनी म्हटलं आहे.

विवेकने आमच्या मनात पेटवलेली ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भविष्य पणाला लागलंय. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही, असे पार्थ म्हणाले.

मी न्यायालयासमोर मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. विवेक आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळण्यासाठी मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे ट्वीट पार्थ पवारांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी मराठ्यांच्या आरक्षणाबाबत भाष्य केले होते. आता पार्थ यांनी या वादात उडी घेतल्याने येणाऱ्या काळात परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 1, 2020, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.