मुंबई - मुंबईत ग्रॅंटरोड पूर्व शहापूर बाग जलभाई लेन येथील इडेनवाला इमारतीचा काही भाग कोसळला. इमारत जुनी असल्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यात 2 लोक जखमी आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
अग्निशामक दल, मुंबई पोलीस व पालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पडलेला भाग हटवण्याचे काम करत आहेत. मुंबईत पावसाळा सुरू झाला, की अनेक इमारती कोसळण्याचा घटना घडतात. अशीच एक घटना आजदेखील घडली आहे. इमारत जुनी झाली असतानाही त्याची पुनर्बांधणी न पुनर्नूतनीकरणाचा न झाल्यामुळे घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मुंबईसारख्या महानगरात कित्येकांना जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. वेगवेगळ्या ठिकाणी इमारत कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबईतील जुन्या बांधकामांचा विषय परत एकदा चर्चेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने जुन्या इमारतीकडे लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. आज ज्या इमारतीचा भाग कोसळला त्या इमारतीचा ऑडिट झालं नव्हतं, असं स्थानिकांच म्हणणं आहे.
हेही वाचा - बच्चन कुटूंबीयांच्या संपर्कात असलेले 26 जण कोरोना 'निगेटिव्ह'
मुंबईतील ३१ हजार को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांपैकी १५ ते १६ हजार सोसायट्यांना तातडीने दुरुस्तीची गरज आहे. या सोसायटींचे त्याच कारणांमुळे पुनर्बांधकाम केले जात नाही. अशा इमारतींची दुरुस्ती करण्याऐवजी पुनर्नुतनीकरणाचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, पुनर्नूतनीकरण करणे हा दुरुस्तीचा पर्याय होऊ शकत नाही. सोसायट्यांनी दुरुस्तीवर भर दिला पाहिजे. ते टाळण्यासाठी पुनर्नूतनीकरणाचा सोपा पर्याय अवलंबता कामा नये. मात्र, दुर्दैवाने यातील जेमतेम दहा टक्के इमारती दुरुस्ती करतात त्यामुळेच अशा घटना घडत आहेत.