ETV Bharat / city

पालकांचा पालिका शाळांकडे ओढा; पैसे कमाविणाऱ्या खासगी शाळांविरोधात पालकांनी उघडली मोहीम - खासगी शाळांकडून फीसाठी दबाब

चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळेच्या मनस्तापाला सामोरे जाऊन देखील पालक विद्यार्थ्यांना शिकवत होते. मात्र आता या खासगी शाळेच्या विरोधात कांजूरमार्गमधून बंडाला सुरुवात झालेली आहे. 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पालिकेच्या इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला आहे. तसेच या 10 पालकांनी एकत्र येत खासगी शाळांच्या विरोधात मोहीम उघडली आहे,

पैसे कमाविणाऱ्या खासगी शाळांविरोधात पालकांनी मोहीम

author img

By

Published : Aug 18, 2021, 10:44 AM IST

Updated : Aug 18, 2021, 12:00 PM IST

मुंबई - कोरोना महामारीलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही लगाम लागला. मात्र पालकांच्या या आर्थिक मंदीच्या परिस्थितीत खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा लावण्याचा प्रकार समोर येत आहे. याच तगाद्याला कंटाळून कांजूरमार्ग येथील 50 पालकांनी एकत्र येत आपल्या पाल्याचे नाव खासगी शाळेतून काढले आणि पाल्याला पालिकेच्या शाळेत घातले आहे. फक्त नाव काढूनच पालक शांत बसले असे नाहीत, तर त्यांनी खासगी शाळांच्या विरोधात तर पालिका शाळांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून पालिका शाळा कशा प्रकारे काम करताहेत, याबाबत पालकांकडून जनजागृती केली जात आहे.. या मोहिमेबाबत ई- टीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा..

पालकांचा पालिका शाळांकडे ओढा

शिक्षणाचा दर्जा कसा? यावर अवलंबून प्रवेश

प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या दहा वर्षांत (2009-10 ते 2018-19) मुंबई महापालिकेच्या एकूण 257 शाळा बंद करण्यात आल्य्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांवाचून काही शाळा एकमेकांत विलीन करण्यात आल्या. यामध्ये 132 मराठी शाळा होत्या. तर गुजराती, तमिळ, तेलगू आणि कन्नड माध्यमांच्या मिळून एकूण 96 शाळा बंद करण्यात आल्या. वर्ष 2018-19मध्ये महापालिकेच्या 23 मराठी शाळा बंद करण्यात आल्या. पालिका शाळेत चांगले शिक्षण मिळत नाही, म्हणून विद्यार्थी येत नव्हते असे या सगळ्यामागचे गणित होते.

पालकांचा पालिका शाळांकडे ओढा
पालकांचा पालिका शाळांकडे ओढा

पालकांच्या खिशाला खासगी शाळांकडून कात्री-

चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळेच्या मनस्तापाला सामोरे जाऊन देखील पालक विद्यार्थ्यांना शिकवत होते. मात्र आता या खासगी शाळेच्या विरोधात कांजूरमार्गमधून बंडाला सुरुवात झालेली आहे. 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पालिकेच्या इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला आहे. तसेच या 10 पालकांनी एकत्र येत खासगी शाळांच्या विरोधात मोहीम उघडली आहे, या मोहिमेच्या माध्यमातून इतर पालकांनीदेखील पाल्यासाठी पालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी ते प्रवृत्त करत आहेत. पालकांचा लाखो रुपयांचा खिसा दरवर्षी या खासगी शिक्षण संस्थांकडून कापला जायचा. मात्र कोरोना काळात पालकांचे डोळे उघडले आहेत, असे या घटनेवरून दिसत आहे.

तर विद्यार्थी संख्या वाढेल-

कोरोना महामारीत सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. मात्र खासगी शाळांनी त्यांचा मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. त्याविरोधात आम्ही लढादेखील दिला. शेवटी आम्ही आमच्या मुलांना नेहरू नगर मुंबई पब्लिक स्कूल मध्ये टाकण्याचे ठरवले. येणाऱ्या काळात मुंबईतल्या सगळ्याच पालकांची जर मानसिकता अशी बदलली. तर पुन्हा एकदा या महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल असे या मोहिमेतील सदस्य पालक वृषाली पनवेलकर आणि श्वेता पावसकर यांनी सांगितले.

खासगी शाळातील मनमानी, अन शिक्षणाचा उत्तम दर्जा पालिका शाळेतील शिक्षकांनी वाढवला आहे. दिल्ली पब्लिक स्कुलच्या धर्तीवर एक मोहीम सुरू केली मुंबई पब्लिक स्कुल यामुळे या मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या काही भागातले चित्र बदलताना दिसत आहे. यामुळे आम्ही देखील आमच्या पाल्यांचा पालिका शाळेत प्रवेश घेतला आहे व आम्हाला याची हमी आहे की आमच्या पाल्याला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल असे पालकांनी सांगितले.
हेही वाचा - मुलांना कोरोनाचा धोका नको म्हणून सरकारने शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला - नीलम गोऱ्हे

Last Updated : Aug 18, 2021, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.