ETV Bharat / city

मुंबईत फ्री फ्लाइट झोनमध्ये पॅराग्लायडर्स, बलून, उंच फटाके उडवण्यास बंदी - मुंबई फ्री फ्लाईट झोनम बातमी

मुंबईत फ्री फ्लाईट झोनमध्ये पॅराग्लायडर्स, बलून, उंच फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश २१ एप्रिल ते १९ जून २०२१पर्यंत हे निर्बंध कायम असतील, असे शासनाने नमूद केले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 27, 2021, 7:24 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाइट झोन) विमानांच्या लॅंडिंग, टेक ऑफ तसेच उड्डाण मार्गामध्ये अडथळा आणणारे पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडवण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. येत्या २१ एप्रिल ते १९ जून २०२१पर्यंत हे निर्बंध कायम असतील, असे शासनाने नमूद केले आहे.

विमानतळाच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडिंग), विमानाच्या उड्डाणात (फ्लाइट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याचा प्रकार वाढीस लागले आहेत. नागरिकांनी अशा घटनांची स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणिवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मुंबई महापालिका अधिनियम आणि पोलीसांमार्फत कठोर कारवाई करावी, असे आदेश मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी काढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.