मुंबई - विचारवंत आणि भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी आज मुंबई उच्च न्यायालयात गोविंद पानसरे यांचे कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांच्या वतीने करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये पुण्यामध्ये पानसरे यांची हत्या करण्यात आले होती.
न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्ही जी बिष्ट यांच्या खंडपीठाकडे हा अर्ज करण्यात आला आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे एक मोठा कट असून त्याचा व्यवस्थित तपास होणं गरजेचं असल्याचं पानसरे यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे.
हत्येचा तपास एटीएसकडे द्या - नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याने तो दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणं आताच्या घडीला अशक्य आहे. मात्र पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे देणं शक्य असल्याचं उच्च न्यायालयासमोर केलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने याबाबत राज्यसरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली - दरम्यान पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. न्यायालयाने यावर राज्य सरकारला 4 आठवड्यात नव्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर सध्याच्या तपास अधिकाऱ्याची बदली करता येईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
गोविंद पानसरे हत्येचा तपास ATS कडे द्या, पानसरे कुटुंबाचा उच्च न्यायालयात अर्ज - कॉम्रेड गोविंद पानसरे कुटुंबियांची उच्च न्यायालयात याचिका
नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याने तो दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणं आताच्या घडीला अशक्य आहे. मात्र पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे देणं शक्य असल्याचं उच्च न्यायालयासमोर केलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने याबाबत राज्यसरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.