ETV Bharat / city

भाजप राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती : तावडेंसह पंकजा आनंदित, खडसे नाराज - विनोद तावडे राष्ट्रीय सचिव बातमी

भाजपने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या यादीत १३ जणांचा समावेश असून यात राज्यातील सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचे देखील नाव आहे. मुंडे व तावडे यांना पक्षाने संधी दिली असली तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे.

pankaja khadse tavade
भाजप राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती : तावडेंसह पंकजा आनंदित, खडसे नाराज
author img

By

Published : Sep 26, 2020, 6:52 PM IST

मुंबई - भाजप पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. भाजपच्या या नव्या कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्यासह राज्यातील आणखी दोन नेत्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे दोघांनी ही ट्विट करत वरिष्ठांचे आभार मानले आहे. पण एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये नाराजी आहे.

राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये खासदार हिना गावित यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राज्यातील नेते असलेल्या विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर पंकजा यांना विधानपरिषद अथवा राज्यसभेवर जागा देण्यात न आल्याने त्यांच्यात व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण आज मुंडे व तावडे यांना पक्षातर्फे आज राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते व समर्थक आनंदात आहेत.

पक्षातर्फे आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या यादीत १३ जणांचा समावेश असून यात राज्यातील सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचे देखील नाव आहे. मुंडे व तावडे यांना पक्षाने संधी दिली असली तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. खडसे गेल्या बऱ्याच दिवसांपासून पक्षावर नाराज असून त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीररित्या बोलूनही दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नव्या कार्यकारणीतही त्यांना कोणतीच जबाबदारी न देण्यात आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे आता खडसे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचे खडसे यांनी याअगोदर जाहीर केले होते. त्यांच्याशी आता संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर दिले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.