ETV Bharat / city

...तर त्याचे परिणाम सरकारला सहन करावे लागतील, जीवरक्षकांचा इशारा

सरकारने मागण्या मान्य केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिण्याच्या तयारीतही ते आहेत. सरकारने आम्हाला येथून हालविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सरकारला सहन करावे लागतील, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

panaji
panaji
author img

By

Published : Dec 13, 2020, 10:44 AM IST

Updated : Dec 13, 2020, 11:07 AM IST

पणजी - गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून एका खासगी कंपनीत काम करणारे कामकाग मागील 16 दिवसांपासून येथील आझाद मैदानावर साखळी उपोषण करत आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिण्याच्या तयारीतही ते आहेत. सरकारने आम्हाला येथून हालविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सरकारला सहन करावे लागतील, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

27 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात देशविदेशातील पर्यटक येत असतात. अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास जीवरक्षण करता यावे, याकरिता गोवा सरकारच्या पर्यटन विकास महामंडळातर्फे संपूर्ण किनरपट्टीवर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. सरकारकडे असणारा हा उपक्रम काही वर्षांपूर्वी एका खाजगी कंपनीला ठेक्यावर देण्यात आला आहे. परंतु, कंपनीकडून होणारी पिळवणूक, अपुरे आणि वेळेवर न मिळणारे वेतन, कामाची नसलेली हमी यांमुळे जीवरक्षक म्हणून काम करणारे सुमारे साडेतीनशे युवक मागील दीड वर्षांपासून निदर्शने करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकार याकडे लक्ष देत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवेळी विधानसभेसमोर निदर्शने केली होती. आझाद मैदानावर आंदोलन करण्यापूर्वी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक यांना भेटण्याचा प्रयत्नही केला. परंतू त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनी दि. 27 नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. पंधरवडा झाला तरीही सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

'...तर त्याचे परिणाम सरकारला सहन करावे लागतील'

आंदोलनाविषयी माहिती देताना जीवरक्षक संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर म्हणाल्या, दीडवर्षांपासून आंदोलन करत आहोत. हे जीवरक्षक गेली 10 वर्षे सरकारला सेवा देत आहेत. कंपनी अंतर्गत त्यांना काम करावयाचे नाही. सरकारने आपल्या सेवेत सामावून घेत कामाची हमी द्यावी, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत हे धरणे सुरूच राहणार आहे. सध्या साखळी उपोषण सुरू असून पुढील पाऊल म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. परंतु, मागण्या मान्य होईपर्यंत हालणार नाही. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन आहे. त्याकरिता सरकारने आम्हाला येथून हालविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सरकारला सहन करावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.

Last Updated : Dec 13, 2020, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.