मुंबई - 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींच्या गैरहजेरीत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वात अंग्रेजो भारत छोडो अशा आंदोलन सुरू झाले. देशभरात हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले आहोती दिली आणि त्यांच्या प्राणांची किंमत मोजल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाला. देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जवळ येत आहे. तस- तसे अनेक आव्हान भारतासमोर उभे आहे आणि म्हणूनच या आव्हानात बेलगाम भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हा देखील आजचा राक्षसमोरचा मोठा प्रश्न आहे. एकप्रकारे अघोषित आणीबाणीचा सामना सर्वांना करावा लागत आहे.
संविधानाचे रक्षण करण्याचा संकल्प - या पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट रोजी व 9 ऑगस्ट रोजी मुंबई मधील सर्व पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्ती एकत्र येऊन संघटीत होत संविधानाचे रक्षण करण्याचा संकल्प करणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर जीजी पारिख, हिमांशू कुमार, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, डॉ. सुनीलम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, हे उपस्थित राहणार आहेत.
मजुरांचे जीवन यातनामय बनले - या संदर्भात नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ईटीव्हीला माहिती दिली कि, 'गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये देशांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न, अत्यंत तीव्र होत आहे. त्यातल्या- त्यात कंत्राटी कामगार यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. तर कायमस्वरूपी कामगारांना खाजगीकरणाद्वारे कंत्राटी कामगारांमध्ये ढकलले जात आहे. त्यांना घरी बसवले जात आहे. देशामध्ये आजही 45 कोटी असंघटित मजूर आहेत. अवेळी पडणारा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर येतो.
पदयात्रा लोकमान्य टिळक पुतळा गिरगाव येथून सुरु होणार - हातात आलेलं उभं पीक नष्ट होत आहे. गावात आजही सार्वजनिक आरोग्याच्या पुरेश्या सेवा नाहीत. वस्ती- पाड्या जवळ १२ वी पर्यंत शाळा नाही. ही सर्व परिस्थिती केंद्र शासनाचे धोरण याला कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या क्रांतिकारक आणि आणि शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जी इच्छा आणि आकांक्षा बाळगली होती. ते स्वातंत्र्य, समता, बंधुता पुन्हा मिळवण्यासाठी अहिंसक मार्गाने या पदयात्रेद्वारे संविधान रक्षणाचा संकल्प ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये घेतला जाणार आहे. हि पदयात्रा सकाळी ८:१५ वाजता लोकमान्य टिळक पुतळा गिरगाव येथून सुरु होणार असून ऑगस्ट क्रांती मैदान ग्रांट रॉड येथे समाप्त होणार आहे.
हेही वाचा - Suspense on BJP JDU alliance in Bihar : बिहारची अवस्था महाराष्ट्रासारखी? नितीश यांनी बोलावली बैठक