ETV Bharat / city

बोरीवली विधानसभा मतदारसंघ - आजही भाजपचं पारड जड; कोण मारणार बाजी? - विधानसभा विशेष

शिवानंद शेट्टी हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा गोराई, चारकोप परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. मराठी सोडून इतर मते त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना यंदाच्या निवडणुकीला तगडे आव्हान आहे.

बोरीवली
author img

By

Published : Sep 24, 2019, 5:14 PM IST

मुंबई - बोरीवली मतदारसंघातून 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक लढवून भरघोस मताधिक्य मिळवत विजय मिळवला होता. आगामी निवडणुकांसाठीही या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विनोद तावडे यांचे नाव समोर येत आहे.

हेही वाचा - उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे षडयंत्र; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप

मराठी आणि गुजराती बहुभाषिक मतदार असलेल्या या मतदारसंघात या दोन समाजाचे निवडणुकीवेळी नेहमीच महत्त्व राहिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतदान बोरिवली मतदार संघातूनच झाले होते.

काँग्रेसकडून माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

हेही वाचा - पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : युती न झाल्यास तिरंगी लढाईची शक्यता

शिवानंद शेट्टी हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा गोराई, चारकोप परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. मराठी सोडून इतर मते त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना यंदाच्या निवडणुकीला तगडे आव्हान आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुमारे 1 लाख 27 हजार गुजराती मते, तर मराठी भाषिकांची 1 लाख 23 हजारांच्या दरम्यान असणारी मतं निर्णायक भूमिका बजावणारी होती. यावर्षी जर मनसे आघाडीत सामील झाली तर या मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं.

बोरीवली मतदारसंघामध्ये गोराई खाडी भागात अद्याप मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप या भागात सुटलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनोद तावडे क्रीडा मंत्री असूनसुद्धा काँग्रेसच्या काळात मंजूर झालेली क्रीडा संकुलाची जागा अद्याप पडून आहे. कोणतेही काम न झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. शिवाय वाहतूक कोंडी, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न जैसे थे आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

  • विनोद तावडे - भाजप - 1,08,278
  • उत्तमप्रकाश अग्रवाल - शिवसेना - 29,011
  • नयन कदम - मनसे - 21,765
  • अशोक सुत्राळे - काँग्रेस - 14,993
  • नोटा - 2056

Intro:मुंबई -  निवडणुकीत भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवून भरघोस मतांनी विजयाधिक्य मिळवले. आगामी निवडणूकांसाठीही या मतदार संघातून युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार विनोद तावडे यांचा नाव समोर येतंय.Body:मराठी आणि गुजराती बहुभाषिक मतदार असलेला या मतदारसंघात या दोन समाजाचे निवडणूकीवेळी नेहमीच महत्व राहिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतदान बोरिवली मतदारसंघातूनच झालं होतं.
काँग्रेसकडून माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत.
शिवानंद शेट्टी हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा गोराई, चारकोप परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. मराठी सोडून इतर मते त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. शिवाय मनसे आघाडीत सामील झाल्यास त्यांना मराठी मते सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे विनोद तावडे यांना यंदाची निवडणूकीला तगडे आव्हान आहे.
2014 च्या  विधानसभा  निवडणुकांमध्ये सुमारे 1 लाख 27 हजार गुजराती मते तर मराठी भाषिकांची 1 लाख 23 हजारांच्या दरम्यान असणारी मतं निर्णायक भूमिका बजावणारी होती. यावर्षी जर मनसे आघाडीत सामील झाली तर या मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं.Conclusion:बोरीवली मतदारसंघामध्ये गोराई खाडी भागात अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. झोपडीपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप या भागात सुटलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे क्रीडा मंत्री असून सुद्धा काँग्रेसच्या काळात मंजूर झालेली क्रीडा संकुलची जागा अद्याप पडून आहे. कोणतेही काम तिथे न झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. शिवाय वाहतूककोंडी, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुर्नविकासाचा प्रश्न पगडी सिस्टीममुळे जैसे थे आहे.

*2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल*
विनोद तावडे, भाजप -1,08,278
उत्तमप्रकाश अगरवाल, शिवसेना - 29,011
नयन कदम, मनसे - 21,765
अशोक सुत्राळे, काँग्रेस - 14,993
नोटा - 2056

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.