ETV Bharat / city

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 4 हजारावर रुग्ण, 82 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 4 हजारावर रुग्णआढळले आहेत. शहरात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Over 4,000 patients have been found in Mumbai
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 4 हजारावर रुग्ण, 82 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Apr 29, 2021, 9:26 PM IST

मुंबई - शहरात गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन दोन दिवस 5 हजाराच्या घरात तर सोमवारी 3876 नवे रुग्ण आढळून आले होते. गेले तीन दिवस 4 हजाराच्या घरात रुग्णसंख्या आढळून येत आहे. गुरुवारी 4192 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

5 हजार 650 रुग्णांना डिस्चार्ज -

मुंबईत आज 4 हजार 192 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 44 हजार 699 वर पोहचला आहे. आज 82 जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 072 वर पोहचला आहे. 5 हजार 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 66 हजार 051 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 64 हजार 018 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 79 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 115 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 1 हजार 101 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 38 हजार 848 तर आतापर्यंत एकूण 53 लाख 80 हजार 473 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.