ETV Bharat / city

परदेशातून आलेल्या ४, ५५३ पैकी ३, १५५ प्रवासी मुंबईत क्वारंटाइन तर ३१६ प्रवाशांना सूट

३१५५ प्रवाशांना मुंबईत तर २०६२ प्रवाशांना इतर राज्यात क्वारंटाइन करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या एकूण ३१६ प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Dec 27, 2020, 1:11 PM IST

मुंबई - युके, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. त्या पार्श्वभूमीवर परदेशातून मुंबईत येणाऱ्या विमान प्रवाशांना क्वारंटाइन केले जात आहे. गेल्या सहा दिवसात मुंबई विमान विमानतळावर ४६ विमानाद्वारे ४५५३ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. त्यापैकी ३१५५ प्रवाशांना मुंबईत तर २०६२ प्रवाशांना इतर राज्यात क्वारंटाइन करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या एकूण ३१६ प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ब्रिटनमधील प्रवासी हॉटेलमध्ये क्वारंटाइन

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूंचा नवा प्रकार आढळून आला. जगभरातील आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मुंबईत या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इग्लंडमधील विमानसेवा २३ डिसेंबरपासून बंद केली आहे. विमानतळावरही विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणीवर पालिकेने भर दिला आहे. तसेच सात दिवस क्वारंटाइन ठेवण्यासाठी मुंबईतील विविध हॉटेल्समध्येही दोन हजार रुम राखीव ठेवल्या आहेत.

ब्रिटनमधील ७४५ प्रवासी हॉटेलमध्ये क्वारंटाइन

ब्रिटनमधून मुंबईत २३ डिसेंबरपर्यंत ४ विमाने आली. या विमानामधून १६८८ प्रवासी मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यापैकी ७४५ प्रवाशांना मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले आहे. ६०२ प्रवासी इतर राज्यातील असल्याने त्या राज्याच्या सचिवांशी संपर्क साधून या प्रवाशांना त्यांच्या राज्यात क्वारंटाइन करण्यास सांगण्यात आले आहे. २ प्रवाशांना घरी जाणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

युरोपमधील २४१० प्रवासी मुंबईत होम क्वारंटाइन

युरोप आणि मिडल इस्टमधून ४२ विमाने मुंबईत आली. या विमानांमधून ३७६५ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. त्यापैकी २४१० प्रवाशांना मुंबईत होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. १३८० प्रवासी इतर राज्यातील असल्याने त्यांच्या राज्यात क्वारंटाइन करण्यास सांगण्यात आले आहे. युरोप आणि मिडल इस्ट येथून आलेल्या ३१४ प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट देण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबरपासून आलेल्या ४०९३ प्रवाशांचा शोध सुरू

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूंचा नवा प्रकार आढळून आला. त्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरपासून परदेशातून मुंबईत आलेल्या ४०९३ प्रवाशांचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. विमानतळ प्राधिकरणाने मुंबईतील प्रवाशांच्या दोन याद्या नुकत्याच पालिकेला दिल्या आहे. त्यानुसार पहिल्या यादीत १७९३ तर दुसऱ्या यादीत २३०० प्रवाशी आले आहेत. एकूण ४०९३ प्रवाशी मुंबईसह उपनगरातील आहेत. या प्रवाशांच्या फोन नंबर आणि पत्त्यावर जाऊन आरोग्य तपासणीची मोहिम महापालिकेच्या विभागीय सहायक आयुक्तांमार्फत सुरू केल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले.

'आरोग्याची काळजी घ्या'

परदेशातून आलेल्या प्रवाशांची वर्गवारी केली आहे. ती यादी विभागीय कार्यालयाला पाठवली आहे. वॉर्डमधील सहायक आयुक्तांवर संबंधित प्रवाशांच्या तपासणीची जबाबदारी सोपवली आहे. आरोग्य पथकांची यासाठी निवड केली असून त्यांना प्रवाशांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी संबंधितांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल. दरम्यान, प्रवाशांनी योग्यप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाविषयक लक्षणे आढळली तर तातडीने वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

१६ प्रवासी तर २ निकटवर्तीय पॉझिटिव्ह

इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरपासून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ११२२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी १६ प्रवासी कोरोनाबधित आढळून आले आहेत. १६ पैकी नागपूरमध्ये ४, मुंबई ३, ठाण्यात ३, पुणे २, नांदेड १, अहमदनगर १, औरंगाबाद १, रायगड १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. बाधित रुग्णांच्या निकटवर्तीय लोकांचा शोध घेतला जात आहे. आजपर्यंत ७२ निकटवर्तीयांचा शोध घेण्यात यश आले असून त्यापैकी २ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.