मुंबई - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (MIFF) 17व्या पर्वाचे उद्घाटन केले. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील 400 चित्रपटांचा समावेश आहे. याच महोत्सवात 'OTT आणि इतर ऑनलाइन माध्यमातील डॉक्युमेंटरी निर्मात्यांना संधी' या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्रसिद्ध डॉक्युमेंटरी व चित्रपट निर्माते पियुष पांडे यांनी मार्गदर्शन केले.
मर्यादित प्लॅटफॉर्म - चित्रपट निर्माते पियुष पांडे म्हणाले की, "ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया आधीचा एक काळ होता. ज्यात अनेक चित्रपट निर्मात्यांना डॉक्युमेंटरीज निर्मात्यांना आपली प्रस्तुती आपले क्रिएशन जनतेसमोर मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म नव्हते. मर्यादित प्लॅटफॉर्ममुळे अनेक वेळा चांगले चांगला कन्टेन्ट रिजेक्ट केला जायचा. मात्र काळ बदलला युट्यूब फेसबुकवर आपल्या डॉक्युमेंटरीज शॉर्ट फिल्म अपलोड करू लागले. यातून त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत आपला चांगला कन्टेन्ट होऊ शकले."
OTT मुळे इंडस्ट्री ग्लोबल - पुढे बोलताना पांडे म्हणाले की, "कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच बंद झाल. त्यात चित्रपट गृहांचा देखील समावेश होता. मनोरंजनाची सर्वच साधनं बंद झाल्याने OTT हा नवीन करमणुकीच्या माध्यम प्रकार उदयास आला. मग यात अनेक कंपन्या याच काळात करोडपती झाल्या. त्यामुळे या नविन चित्रपट निर्मात्यांना डॉक्युमेंट निर्मात्यांना स्क्रीन मिळाली. त्यात ओटीटी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभरात याचं जाळं असल्याने इथल्या निर्मात्यांचं निर्मात्यांची मेहनत आणि तिथले सामाजिक विषय जगभर पोहोचली लागले आणि यामुळेच आपली इंडस्ट्री देखील ग्लोबल झाली."
सेन्सरची बंधन नाहीत - "OTT या प्रकाराला निर्बंध नाहीत. तुम्हाला सेंसोर्शिप नाही. त्यामुळे तुमच्या भावना त्याच पद्धतीने भडकपणे तुम्ही दाखवू शकता. ज्यातून समाजाचे खरे प्रतिबिंब तुम्हाला मांडता येतं. आता हळूहळू काही निर्बंध येत आहेत. पण हा प्लॅटफॉर्म चित्रपट निर्माण निर्मात्यांसाठी हक्काचं व्यासपीठ बनले एवढं नक्कीच." असं मत प्रसिद्ध चित्रपट निर्माते मनोज पांडे यांनी व्यक्त केल.