ETV Bharat / city

Orange alert in Mumbai : मुंबईतही पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी - आयएमडी मुंबई पाऊस अंदाज

मुंबईमध्ये मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस ( Mumbai weather update news ) जोरात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेऊनच घराबाहेर पडावे लागणार आहे.

Mumbai orange alert
मुंबई ऑरेंज अलर्ट
author img

By

Published : Jul 12, 2022, 8:27 AM IST

मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र पुढील 3 दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात ( Mumbai rains prediction ) आली आहे.

मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार ( Mumbai rain prediction news ) पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईकराने पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावे.

हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाचा अंदाज
मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर-
गेल्या तीन दिवसापासून राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तिथली परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासूनच गडचिरोलीच्या दौऱ्यावर असून तेथील आढावा घेत आहेत. तीन दिवस होणाऱ्या सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तेथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धुळे, पालघर, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सातत्याने सुरू आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज-कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अपयशी-चार महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

हेही वाचा-CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

हेही वाचा-Water Released From Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा-Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र पुढील 3 दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात ( Mumbai rains prediction ) आली आहे.

मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार ( Mumbai rain prediction news ) पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईकराने पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावे.

हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाचा अंदाज
मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर-गेल्या तीन दिवसापासून राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तिथली परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासूनच गडचिरोलीच्या दौऱ्यावर असून तेथील आढावा घेत आहेत. तीन दिवस होणाऱ्या सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तेथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धुळे, पालघर, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सातत्याने सुरू आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज-कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अपयशी-चार महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

हेही वाचा-CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

हेही वाचा-Water Released From Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा-Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.