मुंबई - कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते. 'भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या ? अशी टिका परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. रवीवारी ज्या महिला आझाद मैदावर उपस्थित होत्या त्या महिला भेंडी बाजारातील होत्या मग त्या महिला आजच्या मोर्चात सहभागी कशा झाल्या होत्या, असा दावा दरेकर यांनी केला.
शेतकरी मोर्चाचे शिष्ठमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार होते. मात्र, राज्यापालांच्या पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे ते राजभवनावर उपस्थित नाहीत. परंतु राज्यपालांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टिका या आंदोलक शेतकऱ्यांकड़ून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांची काही राजकीय पक्षांकडून दिशाभुल होत आहे. 'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहेत. ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको. कोरोना संकट काळात राज्यपालांचे काम संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्यपालांकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून गोव्यातील अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे नियोजन चार महिन्यापुर्वीच करण्यात आले होते. विधीमंडळाचे कार्यक्रम चार महिन्यांआधी ठरतात हे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना विधामंडळाच्या नियोजनाची माहिती नाही का? झोपलेल्या लोकांना उठवता येतं, परंतु झोपेचे सोंग केलेल्यांना उठवता येत नाही,असं म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला