मुंबई : यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेल्या खाजगी बसने पेट (bus Caught Fire In Nashik) घेतला. आगीत आतापर्यंत 12 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला, तर 34 व्यक्तींना शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या सर्वांवर आता शासनाने मदत मदत जाहीर केलेली आहे, ती (bus accident in Nashik) होईलच. परंतु रस्ते सुरक्षाचे काय ? तसेच अपघात झाल्यानंतर 108 क्रमांकावर लोकांनी संपर्क केल्यावर ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली नसल्याची, माहिती जनतेकडून प्राप्त झाली असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे.
रस्ते सुरक्षेविषयी फक्त चर्चा - अपघाताच्या संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क केला असता ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच विनायक मेटे यांचे अपघात निधन झाले. त्यानंतर रस्ते सुरक्षा याविषयी खूप चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्ये एक आठवडाभर बातम्या गाजल्या. मात्र रस्ते सुरक्षा आणि अपघात याबद्दल अद्यापही महाराष्ट्रमध्ये सुसज्ज यंत्रणा नाहीये.
अपघाताला प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. तसेच दुर्दैवी ही घटना झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी 108 या क्रमांकावर ॲम्बुलन्ससाठी विचारणा केली असता, ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली नसल्याचं नागरिकांनी कळवलं (Ambadas Danve statement) आहे, असं ते म्हणाले.