मुंबई - दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिव्यांचा वाद पेटला आहे (who fitted lamps on grave of Yakub Memon). भाजपकडून शिवसेनेसहित महाविकास आघाडीवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेनेचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही कबरीवर एलईडी दिवे लावणाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे (Ambadas Danve demands action). भाजपच्या आरोपांचा दानवे यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.
मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का देण्यात आला? - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, एखाद्या दहशतवाद्याची फाशी दिल्यावर अशी सजावट केली जात असेल तर ती निश्चितच स्वागतार्ह नाही. मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का देण्यात आला? त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोक तेथे जमले होते. गेल्या 10-15 दिवसात येथे मार्बल लावण्यात आले. येथील प्रभागात भाजपच्या नगरसेविका कार्यरत होत्या. तर मेमनचा मृतदेह देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. मग आम्ही त्यांना आणि भाजपला जबाबदार धरायचे का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. तसेच विनाकारण टीका टिप्पणी करून आम्ही राजकारण करत नाही. मात्र अशाप्रकारे दहशतवाद्याचे उदात्तीकरण करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली आहे.
भाजपचा मविआवर आरोप - दुसरीकडे (BJP accuses MVA)दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात आहे. भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण झालं, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केला आहे. यावर बोलतानाचं, मेमनबद्दल सहानुभूती असण्याचे कारण नाही. पाच वर्षांपूर्वी जुना चौथरा तुटलेला होता म्हणून नवीन चौथरा बांधण्यास परवानगी दिली होती. अस स्पष्टीकरण जामा मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष शोयब खतीबांनी दिल आहे.