मुंबई - राज्यात अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना दोन मंत्र्यांचे सरकारवरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली असतानाच संध्याकाळी राजभवन गाठून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. राज्यपालांनी तत्काळ मदतीची ग्वाही दिल्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) म्हणाले. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिसाला देण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन दिले.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत विदर्भ आणि मराठवाड्यात 115 लोकांची जीव गेला आहे. दोन मंत्री कारभार हाकत असले तरी मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागांना तातडीने मदत, हेक्टरी 75 हजार तर रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत द्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेवून सरकार सोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - Ajit Pawar : 'एवढे मोठे मंत्रिमंडळ की... '; अजित पवारांनी शेलक्या शब्दात घेतली शिंदे सरकारची फिरकी