मुंबई - गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेली होती. मात्र आमचे सरकार आल्यानंतर राज्यांमध्ये निर्बंध मुक्त सण साजरे होत आहेत. आता येणार ही सर्व सण राज्यांमध्ये निर्बंध मुक्तच Festivals are celebrated free of restrictions साजरी होतील. सणांवरील निर्बंध हटल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. लोकांमधली नकारात्मकता संपत चालली आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका - निवडणुकातही आम्हाला पाठिंबा We will get support in elections too मिळेल. निवडणुकांची चिंता शिवसेना, Shiv Sena is not worried about elections भारतीय जनता पक्षाला कधीही नाही. उलट निवडणुकीची चिंता त्यांना आहे. आमचे सरकार रात्रंदिवस जनतेसाठी काम करत आहे. त्यामुळेच पालिका निवडणुकीची चिंता त्यांना आहे आम्हाला नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray यांना नाव न घेता लगावला.
आमचे सरकार आनंदाने सण साजरे करणार - दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, दसरा अजून खूप दूर आहे . आधी पितृपक्ष त्यानंतर नवरात्र मग दसरा साजरा होणार आहे. आमच्या सरकार दसरा-दिवाळी हे सर्व आनंदाने साजरा करेल असा चिमटा दसरा मेळावा वरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लावली विसर्जन सोहळ्याला हजेरी - गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त Anant Chaturdashi गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर..." या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटी येथे विसर्जन स्थळाला भेट दिली. लोकांमध्ये असलेला उत्साह आणि आनंद जाणून घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.